POCO X7 Pro Price in India: Value for Money in ₹20,000-25,000 Segment

20 हजारात चांगला फोन शोधत आहात? POCO X7 Pro हा तुमच्यासाठी Value for Money पर्याय ठरू शकतो. Dimensity 8400 Ultra प्रोसेसर, 120Hz AMOLED डिस्प्ले, 6550mAh बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंग यामुळे हा फोन मल्टीटास्किंग, गेमिंग आणि रोजच्या वापरासाठी मजबूत आहे.
या पोस्टमध्ये POCO X7 Pro ची किंमत, पूर्ण स्पेसिफिकेशन्स, प्रोस & कॉन्स आणि खरेदी करावा का याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

6.67 इंच 1.5K 120Hz AMOLED Display

MediaTek Dimensity 8400 Ultra Processor

50MP OIS Dual Camera

6550mAh Battery + 90W Fast Charging

8GB/12GB RAM + 256GB Storage

HyperOS 2 based on Android 15

स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

Device name: Poco X7 Pro

Display: 6.67 inch1.5k AMOLED Display 120Hz Refresh rate

Processor: Mediatek Dimensity 8400 Ultra ( 4nm ) Processor

Battery: 6550mAh Battery with 90W wired fast Charger

Rear Camera: Dual Setup Camera 50MP OIS Camera And 8MP (ultrawide) Camera with f/2.2 Aparcher

Front Camera: 20MP From Camera with f/2.2 Aparcher

RAM: 8GB And 12GB LPDDR5X RAM

Storage: 256GB Storage with (UFS 4.0)

OS: HyperOS 2 with Android 15

Connectivity: wi-fi 6 , Bluetooth 5.4, NFC, USB Type-C 2.0 , IR Blaster, 5G Support, Wi-Fi calling support, Dual SIM support

Poco X7 Pro

स्मूथ 120Hz डिस्प्ले

Poco X7 Pro चा डिस्प्ले 6.67 इंच 1.5k AMOLED डिस्प्ले आहे 120Hz रिफ्रेश रेट आणि 1400 नीट्स HBM तसेच 3200 निट्स पीक ब्राईटनेस मिळते आणि ही डिस्प्ले 1920Hz PWM डिमिंगला सपोर्ट सुद्धा करते 68B कलर्स,डॉल्बी व्हिसन आणि HDR 10+ चा सपोर्ट डिस्प्ले मध्ये दिला आहे. तसेच याचा डिस्प्ले संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिला ग्लास 7i दिला आहे. 88.8% स्क्रीन टू बॉडी रेटिओ आहे आणि 1220 x 2712 पिक्सेल रिसोल्युशन ची डिस्प्ले आहे

6550mAh मोठी बॅटरी

Poco X7 Pro मध्ये 6550mAh ची मोठी बॅटरी दिली आहे जर तुम्ही नॉर्मल वापरकर्ते असाल तर तुम्हाला हा स्मार्टफोन 100% चार्ज मध्ये 1.5 दिवसाचा बॅटरी बॅक अप देऊ शकतो आणि हेवी गेमिंग वापरकर्त्यांसाठी हा स्मार्टफोन 6 ते 7 तासाचा बॅटरी बॅक देऊ शकतो.आणि तसेच या स्मार्टफोन ला चार्ज करण्यासाठी 90W ची फास्ट चार्जिंग सपोर्ट सुद्धा दिलेला आहे. आणि कंपनीने स्मार्टफोन मध्ये रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट दिला आहे याचा फायदा अशा की तुम्ही प्रवासात असताना इतर डिव्हाईसना चार्ज करू शकता.

डिमेन्सिटी 8400 अल्टा प्रोसेसर

Poco X7 Pro मध्ये मिडियाटेक डिमेन्सिटी 8400 अल्टा 4nm टेक्नोलॉजी वर आधारित आहे हा प्रोसेसर पॉवरफुल आणि पॉवर एफिसियंट देखील आहे त्याच्यामुळे बॅटरीची खपत पण कमी होते आणि चांगला बॅटरी बॅक अप मिळतो या स्मार्टफोन मध्ये GPU Mali-G720 MC7 मिळतो 20 हजारात गेमिंग युजर्स साठी हा स्मार्टफोन एक व्हॅल्यू फॉर मनी पर्याय ठरू शकतो डिसेंट गेमिंग साठी हा स्मार्टफोन चांगला आहे पण हेवी गेमिंग वापरकर्त्यांसाठी हा स्मार्टफोन थोडा अव्हरेज ठरू शकतो

50 मेगापिक्सेल OIS कॅमेरा

Poco X7 Pro चा मागील कॅमेरा सेटअप बघितला तर या स्मार्टफोन मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो प्रायमरी सेन्सर f/1.5 अपर्चर सह 50 मेगापिक्सेल OIS कॅमेरा आहे दुसरा f/2.2 अपर्चर सह 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड कॅमेरा सेन्सर आहे. तसेच हा स्मार्टफोन 4K 24/ 30/60 FPS आणि 1080p 30/60 FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो 

या स्मार्टफोन चा फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सेल चा आहे f/2.2 अपर्चर आहे. आणि हा स्मार्टफोन 1080p 30 FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो

कनेक्टिव्हिटी स्पेसिफिकेशन

Poco X7 Pro ची कनेक्टिव्हिटी बघितली तर याच्यात Wi-Fi 6, Bluetooth 5.4, NFC, USB type-C 2.0, Wi-Fi calling support , Dual SIM support 5G Network support IR Blaster हे सगळे कनेक्टिव्हिटी स्पेसिफिकेशन या स्मार्टफोन मध्ये आपल्याला मिळतात

स्मार्टफोनचा टिकाऊपणा

स्मार्टफोनच्या टिकाऊपणाबद्दल बोलायचे झाले. तर हा स्मार्टफोन दिर्घकाळ वापरासाठी कंपनीने बनवला आहे.
तसेच याला धूळ आणि पाण्यापासून वाचण्यासाठी या स्मार्टफोन कंपनीने याच्यात IP67/IP68/IP69 ची डस्ट आणि वॉटर रजिस्टंट ची सर्टिफिकेशन दिलेली आहे. आणि स्मार्टफोन कंपनी अशा दावा करते की हा स्मार्टफोन 2 मीटर पाण्यामध्ये 48 तासापर्यंत राहू शकतो

रॅम आणि स्टोरेज

हा स्मार्टफोन 8GB आणि 12GB असे दोन रॅम व्हेरियंत उपलब्ध आहेत आणि तसेच याचा स्टोरेज व्हेरियंट मध्ये फक्त 256GB व्हेरियंट उपलब्ध आहे फक्त भारतात ग्लोबल मॉडेल मध्ये 512GB स्टोरेज व्हेरियंट उपलब्ध आहे भारतात फक्त 256GB स्टोरेज व्हेरियंट उपलब्ध आहे

स्मार्टफोनचा ऑपरेटींग सिस्टम

हा स्मार्टफोन Hyper OS 2 ऑपरेटींग सिस्टम वर चालतो. तसेच इन बॉक्स अँड्रॉइड 15 मिळतो. आणि 3 वर्षाचे अँड्रॉइड अपडेट मिळतील आणि 4 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट मिळतील

स्मार्टफोनचे फायदे आणि तोटे

फायदे

परफॉर्मन्स: Dimensity 8400 Ultra चिपसेट गेमिंग किंग (BGMI, COD, Genshin Impact जसे गेम उच्च सेटिंग्सवर स्मूथ प्ले करतो). फ्लॅगशिप लेव्हल स्पीड आणि सस्टेनड परफॉर्मन्स देतो.

डिस्प्ले: 1.5K AMOLED, 120Hz, Dolby Vision, 3200 nits ब्राइटनेस खूप वाईब्रॅन्ट आणि प्रीमियम फील देतो.

बॅटरी: 6550mAh आणि 90W फास्ट चार्जिंग 1.5 ते 2 दिवस सहज बॅटरी बॅक अप फास्ट चार्जिंग (0-100% फक्त 40-50 मिनिटांत).

बिल्ड: Gorilla Glass 7i फ्रंट प्रोटेक्शन, IP68/IP69 रेटिंग पाणी आणि धूळ प्रतिरोध

व्हॅल्यू फॉर मनी: ₹23,000 ते ₹25, 000हजारात इतके स्पेक्स मिळणे कठीण.

तोटे

स्टोरेज: microSD स्लॉट नाही, 512GB व्हेरिएंट भारतात उपलब्ध नाही

इतर: No wireless charging, average haptics, कधीकधी heating (गेमिंगमध्ये). प्रॉब्लेम येतात

कॅमेरा: Main camera ठीक आहे, पण ultrawide आणि selfie कमकुवत आहे.

सॉफ्टवेअर (HyperOS): Bloatware आहेत (अनेक प्रिन्स्टल ऍप) कधीकधी बॅकग्राउंड ऍप बंद होतात अपडेट्समुळे बॅटरी ड्रेन/हिटिंग इश्यूज येऊ शकतात

भारतात स्मार्टफोनची किंमत

Poco X7 Pro ची सध्याची किंमत फ्लिपकार्ट वर 8GB+256GB 23,999 आहे आणि 12GB+256GB 25,999 इतकी किंमत फ्लिपकार्ट वर आहे

निष्कर्ष

माझ्या मते POCO X7 Pro ₹20,000-25,000 बजेटमध्ये performance आणि battery life साठी उत्तम value for money फोन आहे. गेमिंग आणि heavy users साठी हा चांगला पर्याय ठरू शकतो.

2 thoughts on “POCO X7 Pro Price in India: Value for Money in ₹20,000-25,000 Segment”

Leave a Comment