OPPO Reno 16 स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच होणार अशी अपेक्षा आहे. या स्मार्टफोन मध्ये लिक्सनुसार 50MP कॅमेरा सेटअप मिळणार असे अपेक्षित आहे AI वैशिष्ट्ये मोठी बॅटरी असे बरेच नवीन फिचर्स मिळतील. आणि तसेच या स्मार्टफोनचे अपेक्षित डिटेल स्पेसिफिकेशन आणि लाँच तारीख आज या ब्लॉग पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत.
या पोस्ट मध्ये सांगितलेली माहिती लिक्सआणि मीडिया रिपोर्ट वर आधारित आहेत ऑप्पो कंपनीने सध्या सगळे स्पेसिफिकेशन जाहीर केले नाहीत ऑफिसिअल लाँच नंतर कंपनीकडून फिचर्स आणि स्पेसिफिकेशन मध्ये बदल करण्याची शक्यता असू शकते
OPPO RENO 16 Feature
6.32 इंच AMOLED 120Hz FHD + OLED फ्लॅट डिस्प्ले आणि 3600 नीट्स पर्यंत पीक ब्राईटनेस सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे
स्नॅप्ड्रॅगन 7 जेन 4 प्रोसेसर आणि 10 बीट कलर सपोर्ट मिळेल अशी अपेक्षा आहे
LPDDR5X RAM आणि UFS 3.1 स्टोरेज आणि भारतात लाँच झाल्यावर 8GB + 256GB आणि 12GB + 256GB स्टोरेज व्हेरियंट उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
OPPO Reno 16 Series Launch Date
येत्या जुलै महिन्यात oppo reno 16 स्मार्टफोन भारतात लाँच होण्याची शक्यता आहे हा स्मार्टफोन 2 जुलै रोजी भारतीय बाजारपेठेत सादर केला जाऊ शकतो. भारतात 8GB + 256GB आणि 12GB + 256GB असे स्टोरेज व्हेरियंट उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच LPDDR5X RAM टाईप आणि UFS 3.1 स्टोरेज मिळू शकते.
OPPO Reno 16 series Display Specification
Oppo reno 16 मध्ये 6.32 इंचाचा AMOLED फ्लॅट डिस्प्ले दिला जाऊ शकतो.आणि हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट FHD + (2640 × 1216 ) पिक्सेल रिसोल्युशनसह येण्याची शक्यता आहे. या डिस्प्ले मध्ये 10 बीट कलर्स सपोर्ट ,1800 निट्स HBM आणि 3600 निट्स पीक ब्राईटनेस मिळू शकते डिस्प्ले मध्ये 3840Hz PWM डिमिंगला सपोर्ट असल्या कारणामुळे कमी प्रकाशातही डोळ्यांवर कमी ताण येण्यासाठी मदत होते.
OPPO Reno 16 series Processor
लिक्स नुसार oppo reno 16 मध्ये स्नॅप्ड्रॅगन 7 जेन 4 प्रोसेसर येण्याची शक्यता आहे हा प्रोसेसर पॉवरफुल आणि पॉवर एफिसियंट देखील आहे 4nm टेक्नॉलॉजी वर आधारित असलेला हा प्रोसेसर रोजचे टास्क सुरळीतपणे हॅण्डल करू शकतो. तसेच प्रोसेसर पॉवर एफिसियंट असल्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी चांगली टिकते
गेमिंगसाठी हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय ठरू शकतो कारण Free Fire आणि Call of Duty सारखे गेम हाय सेटिंग वर सहज खेळू शकता आणि BGMI मध्ये 90 FPS किंवा त्याहून अधिक FPS सपोर्ट मिळेल हे. स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर निश्चित होईल
Genshin Impact सारखे हेवी गेम जास्त वेळेपर्यंत खेळले तर हीटिंग समस्या आणि FPS ड्रॉप सारख्या समस्या उद्भवू शकतात
OPPO Reno 16 camera specification
नवीन लाँच होणाऱ्या Oppo reno 16 series मध्ये तीन कॅमेरा सेटअप मिळेल अशी अपेक्षा आहे पहिला मेन कॅमेरा सेन्सर 50 मेगापिक्सेल चा OIS कॅमेरा मिळण्याची अपेक्षा आहे दुसरा कॅमेरा 50 मेगापिक्सेल चा OIS 3.5x ऑप्टिकल झूम सह टेलिफोटो परिस्कोप सेन्सर आणि 50 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड कॅमेरा सेन्सर मिळेल अशी शक्यता आहे.
लीकनुसार स्मार्टफोन फ्रंट कॅमेरा 50 मेगापिक्सेल चा असण्याची शक्यता आहे
लीकनुसार हा स्मार्टफोन रिअर आणि फ्रंट कॅमेऱ्यांद्वारे 4K 30 FPS आणि 4K 60 FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो
याची पूर्ण पुष्टी अधिकृत लाँच नंतर होईल
OPPO Reno 16 Battery and Charging
OPPO reno 16 स्मार्टफोन मध्ये सिलिकॉन कार्बन ची मोठी बॅटरी 6700mAh असण्याची शक्यता वर्तवली आहे. आणि स्मार्टफोन ला फास्ट चार्ज करण्यासाठी oppo कंपनीने 80W SuperVOOC वायर चार्जिंग सपोर्ट देईल अशी अपेक्षा आहे. तसेच स्मार्टफोन मध्ये 4nm प्रोसेसर असल्यामुळे स्मार्टफोनचा बॅटरी बॅक अधिक चांगला बघायला मिळू शकतो. आणि रिपोर्ट नुसार स्मार्टफोन मध्ये रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट पण असेल.
Conclusion
ओव्हरऑल बघितले तर हा स्मार्टफोन त्याच्या AI वैशिष्ट्यामुळे शक्तिशाली प्रोसेसर, चांगले कॅमेरा सेटअप आणि मोठ्या बॅटरी मुळे एक चांगला आणि आकर्षक असा स्मार्टफोन ठरू शकतो लीक आणि मिडिया रिपोर्ट 4 स्मार्टफोनमध्ये अनेक वैशिष्ट्ये मिळण्याची शक्यता वर्तवली आहे
OPPO Reno 16 Series विषयी ऑफिसियली माहिती भारतातील किंमत आणि सेलची माहिती जाहीर झाली की मी ही पोस्ट अपडेट करेन. अशा स्मार्टफोनच्या अपडेट विषयी आणि स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन विषयी माहितीसाठी माझ्या mobileteck.com वेबसाइटला नियमित भेट द्या
Frequently Asked Questions (FAQ)
1. OPPO Reno 16 भारतात कधी लॉन्च होणार?
लीक्स आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार OPPO Reno 16 भारतात 2 जुलै रोजी लॉन्च होण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम तारीख निश्चित होईल.
2. OPPO Reno 16 मध्ये कोणता प्रोसेसर मिळेल?
लीक्सनुसार OPPO Reno 16 मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. हा 4nm प्रोसेसर असून दैनंदिन वापर, मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी चांगली कामगिरी देऊ शकतो.
2. 3. OPPO Reno 16 मध्ये किती mAh बॅटरी आहे?
मीडिया रिपोर्ट्सनुसार OPPO Reno 16 मध्ये 6700mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टही मिळू शकतो.
4. OPPO Reno 16 ची अपेक्षित किंमत किती आहे?
OPPO कंपनीने अद्याप अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही. मात्र, लीक्सनुसार OPPO Reno 16 ची भारतातील सुरुवातीची किंमत ₹35,000 ते ₹40,000 दरम्यान असू शकते.
5. OPPO Reno 16 गेमिंगसाठी चांगला आहे का?
हो, लीक्सनुसार Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर आणि 120Hz AMOLED डिस्प्लेमुळे OPPO Reno 16 गेमिंगसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. Free Fire, BGMI आणि Call of Duty Mobile सारखे गेम स्मूथपणे खेळता येण्याची अपेक्षा आहे. मात्र, Genshin Impact सारखे हेवी गेम दीर्घकाळ खेळल्यास हीटिंग आणि FPS ड्रॉप जाणवू शकतो.