तुम्ही पण तुमचा जुना स्मार्टफोन आता अपग्रेड करण्याचा विचार करताय का? तर या पोस्टमध्ये 30 हजारात येणारे दोन Best स्मार्टफोन Motorola edge 70 Fusion आणि Realme P4 Power बद्दल माहिती,स्पेसिफिक्शन सांगणार आहे. हे स्मार्टफोन्स कोणत्या वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरतील. आणि कोणासाठी व्हॅल्यू फॉर मनी पर्याय ठरू शकतो. तेच मी या पोस्टच्या माध्यमातून सांगणार आहे. चला मग जाणून घेऊया. या दोन स्मार्टफोन विषयी.
Table of Contents
Toggleस्मार्टफोनचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन
या दोन्ही स्मार्टफोन डिस्प्ले बद्दल बोलायचे झाल्यास Motorola edge 70 Fusion मध्ये 6.78 इंचाचा 1.5K अमोलेड,1B (बिलियन) कलर्स डिस्प्लेमध्ये मिळतात. स्मूथ स्क्रोलिंग अनुभवासाठी यात 144Hz रिफ्रेश रेट,5200 नीट्स पीक ब्राईटनेस, आणि 1272 x 2772 पिक्सेल इतकी डिस्प्ले रिसोल्यायुशन, याचे परिणाम. 162.8 x 75.6 आणि 8mm जाडी, वजन सुमारे 193g एवढे आहे.डिस्प्लेच्या संरक्षणसाठी कॉर्निन गोरिला ग्लास 7i मिळते. तसेच स्मार्टफोन मिलिटरी ग्रेड सर्टिफाईड आहे.
Realme P4 Power च्या डिस्प्ले ची माहिती जाणून घेतली. तर यात तुम्हाला एक 6.8 इंचाचा, 1280 x 2800 रिसोलुन्शन सह अमोलेड डिस्प्ले पॅनल मिळतो. 1B बिलियन कलर्स, 600 निट्स PWM डिमिंगला आणि 144Hz रिफ्रेश रेट मिळते. तसेच 1800 नीट्स पर्यंत (HBM) हाय ब्राईटनेस मोड, 6500 निट्स सोबत पीक ब्राईटनेस सपोर्ट आहे. या स्मार्टफोनच्या डिस्प्ले संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिला ग्लास 7i मिळते. 453 ppi density, 19.5:9 अस्पेक्ट रेसिओ आणि 91.2% स्क्रीन टू बॉडी रेटिओ मिळतो. स्मार्टफोन वजन 219 ग्रॅम वजन आणि 9.1mm जाडी असल्यामुळे, स्मार्टफोन हातात जड वाटण्याची संभावना येते. स्मार्टफोनची परिणामे 162.3 x 76.2 , याशिवाय स्मार्टफोन,मिलिटरी ग्रेड सर्टिफाईड आहे.
Edge 70 Fusion आणि Realme P4 Power प्रोसेसर, बॅटरी, कनेक्टिव्हिटी
या दोन्ही स्मार्टफोन मध्ये मिडियाटेक डिमेन्सिटी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर दिले आहेत. मोटोरोला एड 70 फ्युजन यात 4nm टेक्नॉलॉजी वर बनवलेला,स्नॅपड्रॅगन 7s Gen 4 प्रोसेसर दिला आहे.सोबत ग्राफिक्ससाठी Adreno GPU 810 मिळतो. हा प्रोसेसर डेली यूजसाठी सोशल मीडिया, युट्यूब, मल्टीटास्किंग, ब्राउझिंगसाठी, स्मूथ आणि फास्ट काम करतो.
स्मार्टफोन हलक्या गेमिंगसाठी वापरासाठी सक्षम आहे. पण तुम्ही हेवी गेमिंगला प्राधान्य देत असाल आणि दीर्घकाळ गेमिंग करताना स्थिर FPS हवे असतील. तर स्नॅप्ड्रॅगन 7s Gen 4 किंवा डिमेन्सिटी 8300/8350 सिरीजचे स्मार्टफोन तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतील.
Realme P4 Power च्या प्रोसेसर बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये मिडीयाटेक डिमेन्सिटी 7400 Ultra प्रोसेसर दिलेला असून, तो 4nm टेक्नॉलॉजी वर बनवलेला आहे. तसेच यात ग्राफिक्स साठी Mali-G615 MC2 GPU मिळतो. स्मार्टफोन डेली यूजसाठी सोशल मीडियावर, मल्टी टास्किंग, ब्राउझिंग साठी सक्षम आहे.
स्मार्टफोनमध्ये BGMI, COD Mobile सारखे गेम मध्यम ते उच्च सेटींगवर खेळता येतील. मात्र स्मार्टफोन डेली यूजसाठी कॅज्युअल गेमिंग आणि दीर्घ बॅटरी लाइफ साठी उत्तम ठरू शकतो.
याशिवाय स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटी फिचर्स बद्दल बघितले तर Motorola Edge 70 Fusion मध्ये Wi-Fi 6E, Bluetooth 6.0, NFC, USB Type-C 2.0,GPS, OTG Dual Nano SIM+ Nano SIM (किंवा Nano SIM+ eSIM) सपोर्ट. Realme P4 Power च्या कनेक्टिव्हिटी बघितल्या तर यात Wi-Fi 5, Bluetooth 5.4 ,IR Blaster, USB type-C 2.0,GPS, OTG आणि Dual Nano SIM+ Nano SIM सपोर्ट मिळतो.
याशिवाय दोन्ही स्मार्टफोनमध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो .आणि Motorola edge 70 Fusion मध्ये ड्युअल स्टिरीओ स्पीकर सह डॉल्बी ॲटमॉस मिळतो. Realme P4 Power मध्ये सिंगल स्पीकर आहे ज्याला 400% वॉल्यूम बूस्ट करण्याचा फिचर्स सुद्धा दिला आहे.
या दोन्ही स्मार्टफोन मध्ये तीन – तीन कलर पर्याय उपलब्ध आहेत. Motorola edge 70 Fusion मध्ये पँटोन ब्लू सर्फ,
पँटोन कंट्री एअर,पँटोन सिलुएट कलर्स आणि Realme P4 Power मध्ये पारदर्शक चांदीचा रंग,पारदर्शक निळा रंग,पारदर्शक नारंगी रंग असे कलर्स उपलब्ध आहेत.
Best बॅटरी परफॉर्मन्स
स्मार्टफोन च्या बॅटरी बद्दल माहिती करून घेतली तर Motorola Edge 70 Fusion मध्ये 7000mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. मोठ्या बॅटरी मुळे हेवी युज केला तरी बॅटरी दिवसभर चालू शकते.आणि सोबतच 68W ची फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळत आहे. Realme P4 Power च्या बॅटरी वर लक्ष दिले. तर याच्यात 10001mAh ची खूप मोठी बॅटरी दिली आहे.त्यामुळे मोडरेट यूज मध्ये 2.5 दिवसाचा बॅटरी बॅक देऊ शकतो. या मोठ्या बॅटरीला चार्ज करण्यासाठी बॉक्स मध्ये 80W फास्ट चार्जर मिळतो. तसेच 27W वायर्ड चार्जिंग आणि बायपास चार्जिंग सपोर्टही Realme P4 Power मध्ये मिळतो.
Realme P4 Power मध्ये Realme UI 7.0 सह अँड्रॉइड 16 मिळतो स्मार्टफोन मध्ये 3 वर्षाचे अँड्रॉइड अपडेट आणि 4 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट मिळतील असा दावा कंपनीने केला आहे. तसेच Motorola edge 70 Fusion मध्ये पण अँड्रॉइड 16 सह Motorola चा Hello UI मिळतो. यात कंपनीच्या म्हणन्यानुसार 3वर्षाचे अँड्रॉइड अपडेट व 5 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट मिळतील. Realme पेक्षा 1 एक सिक्युरिटी अपडेट मोटोरोला स्मार्टफोनमध्ये जास्त मिळतो
स्मार्टफोनचे कॅमेरे कसे आहेत
Motorola edge 70 Fusion च्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यात ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. f/1.8 अपर्चर सह 50 मेगापिक्सेलचा (PDAF OIS)प्रायमरी कॅमेरा आणि f/2.2 अपर्चर सह 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा सेन्सर मिळतो. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोन फ्रंट आणि रिअर कॅमेऱ्यामधून 4k 30 FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.
Realme P4 Power मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप सह f/1.8 अपर्चरचा 50 मेगापिक्सेल PDAF OIS कॅमेरा आहे.तसेच याचा सेकंडरी कॅमेरा f/2.2 अपर्चर सह 8 मेगापिक्सल चा अल्टा वाइड कॅमेरा आहे. आणि 16 मेगापिक्सेलचा f/2.4 अपर्चर सह सेल्फी कॅमेरा आहे. जो व्हॉटसॲप व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी उपयुक्त ठरू शकतो. स्मार्टफोनच्या रिअर कॅमेऱ्यामधून 4k 30 FPS आणि फ्रंट कॅमेऱ्यांद्वारे 1080p 30 FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.
या दोन्ही स्मार्टफोनला धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी, मोटोरोला एड 70 फ्युजन मध्ये IP68/IP69 आणि Realme P4 Power मध्ये IP69 ची रेटिंग मिळते.
भारतात स्मार्टफोनची किंमत, स्टोरेज आणि उपलब्धता
Realme P4 Power चा बेस व्हेरियंट LPDDR4X सह 8GB RAM 128GB सह UFS 3.1 स्टोरेज व्हेरियंट ची किंमत ₹25,999 8GB + 256GB ₹27,999, 12GB + 256GB ₹30,999 किंमत असून Motorola edge 70 Fusion LPDDR5X RAM आणि UFS 3.1 स्टोरेज व्हेरियंट सह 8GB + 128GB ₹27,900, 8GB + 256GB ₹29,700, 12GB + 256GB ₹33,000,12GB + 512GB ₹36,999+किंमत आहे. ह्या किंमती वेळोवेळी बदलत राहतात. बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनससह प्रभावी किंमतीत सूट मिळू शकते
हे स्मार्टफोन खरेदी करावे की नाहीत
Motorola edge 70 Fusion स्मार्टफोन मध्ये रिव्हर्स चार्जिंग आणि बायपास चार्जिंग मिळत नाही.पण हा स्मार्टफोन कॅमेरा आणि परफॉर्मन्स च्या बाबतीत Realme P4 Power पेक्षा थोडा बेटर आहे. जर तुम्हाला चांगला परफॉर्मन्स, चांगला कॅमेरा पाहिजे असेल तर तुमच्यासाठी Edge 70 Fusion उपयुक्त ठरू शकतो. तसेच तुम्ही खूप मोबाईल चालवणारे युजर असाल. परफॉर्मन्स आणि कॅमेऱ्या बाबतीत तडजोड करणार असाल तर तुमच्यासाठी Realme P4 Power उपयुक्त ठरूशकतो.बाकी हे स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी पूर्णपणे रिसर्च करून नंतर घेण्याचा विचार करणे तुमच्यासाठी सोयीचे ठरेल.