POCO M8 Power: Big Battery, Long Updates & More

Poco M8 Power हा स्मार्टफोन बजेट फोनची किंमत भारतात 24,999 इतकी असून, स्मार्टफोन मध्ये मोठी क्षमतेची बॅटरी, स्नॅप्ड्रॅगन प्रोसेसर, 7.0 इंचाचा मोठा डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला गेला आहे. याव्यतिरिक्त फिचर्स आणि स्पेसिफिकेशन Poco M8 Power विषयी सविस्तर माहिती पोस्टमध्ये बघूया.

7.0 इंचाचा AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेटसह

स्नॅपड्रॅगन 4 Gen 4 प्रोसेसरसह (4nm) टेक्नॉलॉजी वर आधारित

8000mAh बॅटरी सह 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट

22.5W रिव्हर्स वायर चार्जिंग सपोर्ट

डिस्प्ले

Poco M8 Power च्या डिस्प्ले बद्दल बोलायचे झाले तर यात 7.0 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले,120Hz रिफ्रेश रेटमुळे ऍप स्क्रोलिंग, गेमिंग मधील ऍनिमेशन स्मूथ वाटू शकते. 1080 x 2396 इतके रिसोल्युशन 375 ppi density मुळे डिस्प्ले शार्प व्हिज्युअल दाखवायला सक्षम ठरते. आणि 88.2% स्क्रीन टू बॉडी रेटिओ मुळे डिस्प्लेचे बेझल्स जास्त मोठे दिसत नाहीत.1800 निट्स पीक ब्राईटनेस मिळते, त्यामुळे डिस्प्ले बाहेर प्रकाशातही स्पष्ट दिसते. आणि डिस्प्लेला प्रोटेक्ट करण्यासाठी गोरिला ग्लास 7i दिलेला आहे. त्यामुळे स्क्रीन लहान सहान धक्यांपासून सुरक्षित राहू शकते.

बॅटरी

Poco M8 Power या फोन मध्ये 8000mAh क्षमतेची मोठी बॅटरी मिळते. एवढी मोठी बॅटरी 2 दिवसाचा बॅटरी बॅक अप देण्यास सक्षम ठरू शकते. हेवी वापर करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा स्मार्टफोन उपयुक्त ठरू शकतो. यात 22.5W ची रिव्हर्स वायर चार्जिंग सपोर्ट आणि 45W चा फास्ट चार्जर बॉक्समध्ये मिळतो. आणि हा चार्जर 8000mAh बॅटरीला 1 तास 40 मिनिटात फुल चार्ज करतो. तसेच रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट मुळे प्रवासात असताना स्विच ऑफ फोनला चार्जही करू शकता. आणि मोठी बॅटरी मुळे स्मार्टफोनचे वजन 225g इतके आहे. म्हणून फोन हातात जास्त वेळेपर्यंत घेतला तर , तो जड वाटण्याची संभावना येते.

प्रोसेसर

Poco M8 Power स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 4 Gen 4 Octa core प्रोसेसर मिळतो. जो 2.3GHz पर्यंतच्या क्लॉक स्पीड वर काम करतो. तसेच हा पॉवर एफिसियंट प्रोसेसर 4nm टेक्नॉलॉजी वर बनवलेला असून, बॅटरीची पॉवर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. स्मार्टफोन च्या गेमिंग बद्दल बोलायचे झाले तर. फोनमध्ये मध्यम सेटिंगवर गेम खेळू शकता. मात्र हेवी गेमिंग वापरकर्त्यांसाठी इतर पर्याय चांगले ठरू शकतात. स्मार्टफोन सोशल मीडिया,मल्टीटास्किंग आणि इतर रोजची कामे सहज हाताळू शकतो.

कॅमेरा

Poco M8 Power मध्ये सिंगल कॅमेरा सेटअप आहे पण स्मार्टफोन मध्ये OIS मिळत नाही त्यामुळे व्हिडिओ स्टेबल येऊ शकणार नाहीत. 50 मेगापिक्सेलचा f/1.8 अपर्चर सह PDAF कॅमेरा मिळतो डेलाईट मध्ये ठीक ठाक डिटेल्स फोटो काढून देतो. तसेच फ्रंट कॅमेरा सेल्फी घेण्यासाठी 8 मेगापिक्सलचा आहे. जो f/2.0 अपर्चरसह व्हॉटसॲप कॉलिंग साठी पुरेशा आहे. बाकी सेल्फी घेण्यासाठी कॅमेरा कमकुवत ठरू शकतो.

स्मार्टफोनच्या रिअर आणि फ्रंट कॅमेऱ्यांद्वारे 1080p 30 FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. मात्र गुणवत्ता व्हिडिओ च्या गुणवत्तेत तडजोड करावी लागू शकते.

कनेक्टिव्हिटी ,ऑपरेटींग सिस्टम आणि इतर स्पेसिफिकेशन्स

Poco M8 Power मध्ये ड्युअल बँड Wi-Fi 6, Bluetooth 5.1, GPS, USB Type-C 2.0 सारखे कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध असून, स्मार्टफोन मध्ये हायपर OS 3 सह अँड्रॉइड 16 मिळतो. यात 4 वर्षाचे अँड्रॉइड अपडेट आणि 6 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट मिळतील. असा दावा कंपनीने केला आहे. फोनचे कलर पर्याय बघितले तर, Orange Blaze, Black, Green असे तीन प्रकारचे कलर स्मार्टफोनमध्ये मिळतात. फोन मध्ये UFS 2.2 स्टोरेज सह LPDDR5X RAM,microSD Card सपोर्ट, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, आणि सिंगल स्पीकर बघायला मिळतो. स्मार्टफोनला धूळ पाण्याच्या छटांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी IP65 ची रेटिंग दिली आहे.

किंमत आणि उपलब्धता

Poco M8 Power दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून दिला आहे. आणि या स्मार्टफोन च्या बेस व्हेरियंट ची किंमत 6GB + 128GB ₹24,999 , तसेच 8GB + 128GB स्टोरेज ची किंमत ₹27,999 इतकी आहे. आणि स्टोरेज वाढवण्यासाठी यात Micro SD Card सपोर्ट सुद्धा कंपनीने अँड ऑन केलेला आहे.

अंतिम विचार

Poco M8 Power हा स्मार्टफोन परफॉर्मन्स केंद्रित नाही.तर कंपनीने याच्या बॅटरी वर लक्ष दिले आहे. 8000mAh मोठी बॅटरी, जास्त स्मार्टफोन वापर करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी उपयुक्त पर्याय ठरू शकते. कारण एका चार्ज वर स्मार्टफोन दिवसभर चालू शकतो. सोबतच पॉवर एफिसियंट स्नॅपड्रॅगन 4 Gen 4 प्रोसेसर जो 4nm टेक्नॉलॉजी वर बनवलेला आहे. त्यामुळे बॅटरीची पॉवर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. सांगायचे तर कंपनीने या स्मार्टफोनच्या बॅटरीला प्राधान्य दिले आहे. युजर चे प्राधान्य बॅटरी बॅक अप असेल तर. मात्र थोडीशीच युजरला परफॉर्मन्स मध्ये तडजोड करावी लागू शकते. आणि या किंमत श्रेणीत गेमिंग फोन म्हणून यावर लक्ष केंद्रित करत असाल तर. गेमिंगसाठी दुसरे पर्याय उपयुक्त ठरू शकतात.

ह्या पोस्ट विषयी तुमचे मत काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा..

Leave a Comment