Google Pixel 11: Will spending ₹1 lakh be a waste of money?

Google ब्रँड ने त्याचा नवीनतम स्मार्टफोन Google Pixel 11 सिरीज ऑगस्ट महिन्यात लाँच केले आहेत. या पोस्टमध्ये Google Pixel 11 स्मार्टफोन विषयी थोडक्यात माहिती बघूया. याची किंमत, बॅटरी,प्रोसेसर आणि डिस्प्ले अशा स्पेसिफिकेशन विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Google Tensor G6 3nm प्रोसेसर

Li Ion 4985mAh क्षमतेची बॅटरी 30W चार्जर.

गोरिला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शन.

IP68 सर्टिफिकेशन आणि लेटेस्ट अँड्रॉइड 17

डिस्प्ले

Google Pixel 11 च्या डिस्प्ले बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 6.3 इंचाचा LTPO AMOLED पॅनल मिळतो. डिस्प्ले सिक्युरिटी साठी इन डिस्प्ले अल्ट्रा सोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर सुद्धा दिला आहे. डिस्प्ले चे रिसोल्युशन 1080 x 2424 असून याची पीक ब्राईटनेस 3000 नीट्स पर्यंत जाते. आणि याचा HBM हाय ब्राईटनेस मोड 2000 निट्स पर्यंत मिळते. त्यामुळे बाहेर प्रकाशातही डिस्प्ले स्पष्ट दिसतो.याचा अस्पेक्ट रेसिओ 20:9 आणि 422 ppi डेन्सिटीच्या डिस्प्ले मुळे व्हिज्युअल शार्प आणि क्लिअर दिसतात. स्मार्टफोनचे आकारमान 152.8 x 72 असून, जाडी 8.6mm आहे.

बॅटरी

Google Pixel 11 मध्ये लिथियम एरन ची 4985mAh क्षमतेची बॅटरी मिळते. स्मार्टफोन वजन 197g असून स्मार्टफोन हातात जड वाटत नाही. Google Pixel 11 मध्ये कंपनीच्या दाव्यानुसार 30 तासांची बॅटरी लाइफ मिळते. साध्या वापरामध्ये स्मार्टफोनची बॅटरी दिवसभर चालू शकते. पण फोन सतत वापरत असाल हेवी गेमिंग करत असाल तर कदाचित दिवसभरातून एकदाGoogle pixel 11 ला चार्ज करावा लागू शकतो. स्मार्टफोनच्या बॅटरीला चार्ज करण्यासाठी 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. लक्षात घ्या की स्मार्टफोन बॉक्स मध्ये हा 30W चा फास्ट चार्जर मिळत नाही. तो स्वतंत्र पणे खरेदी करावा लागतो. या 4985mAh क्षमतेच्या बॅटरीला चार्ज करण्यासाठी 30W चा चार्जर 50% 30 मिनिटात चार्ज करतो तसेच स्मार्टफोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग आणि बायपास चार्जिंग सपोर्ट सुद्धा स्मार्टफोन ब्रँड ने दिलेला आहे.

प्रोसेसर आणि कनेक्टिव्हिटी

Google Pixel 11 च्या कनेक्टिव्हिटी आणि प्रोसेसर विषयी बोला6चे झाल्यास, स्मार्टफोनमध्ये 3nm टेक्नॉलॉजी वर बनवलेला Google Tensor G6 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतच सिक्युरिटी साठी टायटन M3 चिप दिलेली आहे. फोन रोजच्या वापरासाठी, सोशल मीडियाचा वापर, मल्टी टास्किंग आणि इतर कामासाठी खूप स्मूथ आहे. स्मार्टफोन गेमिंगसाठी पुरेशा प्रमाणात पॉवर फुल आहे. मात्र खुप हेवी 3D गेमिंग, मॅक्स सेटिंग आणि दीर्घकाळ वापरात तो स्नॅपड्रॅगन ८ एलिट जनरेशन ५ इतका पॉवरफुल नाही. स्मार्टफोनमध्ये वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6e, Bluetooth 6.0, Nano SIM +eSIM सपोर्ट, फक्त US व्हेरियंट साठी eSIM सपोर्ट फिजिकल SIM स्लॉट नाही,USB type-C 3.2,GPS, आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट करण्यासाठी NFC सुद्धा मिळतो. तसेच यात फ्रॉस्ट, पिस्ता, जास्वंद, ऑब्सीडियन असे चार रंगाचे पर्याय उपलब्ध आहेत

स्टोरेज व्हेरियंट आणि ऑपरेटींग सिस्टम

Google Pixel 11 स्मार्टफोन यात LPDDR5X सह 12GB RAM आणि UFS 4.x सह 256GB आणि 512GB स्टोरेज पर्याय मिळतात. पिक्सेल 11 मध्ये एक रॅम प्रकार आणि दोन स्टोरेज व्हेरियंट Google Pixel 11 चे उपलब्ध आहेत. हा स्मार्टफोन Pixel UI अँड्रॉइड 17 सह येतो. Google च्या दाव्यानुसार फोनमध्ये 7 वर्षाचे अँड्रॉइड आणि सिक्युरिटी अपडेट मिळतील. तसेच यात ड्युअल स्टिरीओ स्पीकर मिळतात. आणि स्मार्टफोनला धूळ आणि पाण्यापासून वाचण्यासाठी Google Pixel 11 मध्ये IP68 ची रेटिंग मिळते. त्यामुळे दीर्घकाळ वापरासाठी स्मार्टफोन उपयुक्त ठरतो.

कॅमेरा सेटअप

Google Pixel 11 स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर लक्ष दिले, तर यात ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. f/1.7 अपर्चरचा 24mm वाइड ड्युअल पिक्सेल PDAF 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर OIS कॅमेरा मिळतो. 5x optical zoom सह f/3.1 अपर्चरचा 10.8 मेगापिक्सेलचा ड्युअल PDAF OIS telephoto कॅमेरा आहे. तसेच अजून 13 मेगापिक्सेलचा f/2.2 अपर्चरचा अल्ट्रा वाईड कॅमेरा सेन्सर मिळतो. Google च्या AI प्रोसेसिंग मुळे फोटोची गुणवत्ता खूप चांगली बघायला मिळते. (खासकरून लॉ लाइट आणि झूममध्ये)

सेल्फी घेण्यासाठी f/2.2 अपर्चरचा 20mm अल्टा वाइड PDAF 10.5 मेगापिक्सेल चा कॅमेरा सेन्सर देण्यात आला असून स्मार्टफोन 4k 30 FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. याशिवाय याचा रिअर कॅमेऱ्यामधून पण 4k 30/60 FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. आणि OIS मुळे रेकॉर्ड करताना व्हिडिओ स्थिर येतात. स्मार्टफोन मध्ये अल्युमिनियम फ्रेम आणि मागून ग्लास बॅक मिळतो, ज्याला तुटण्यापासून वाचवण्यासाठी दोन्ही बाजूंनी गोरिला ग्लास विक्टस 2 ची प्रोटेक्शन मिळते.

फायदे आणि तोटे

फायदे

7 वर्षाचे अँड्रॉइड आणि सिक्युरिटी अपडेट मिळतात

12GB RAM असल्यामुळे मागील Google Pixel पेक्षा जास्त एफिशियंट

पहिले बेस व्हेरियंट मध्ये 128GB स्टोरेज मिळत होता आता 256GB स्टोरेज मिळतो

IP68 रेटिंग मिळते आणि 197g वजन असल्याने स्मार्टफोन हातात जड वाटत नाही

तोटे

हार्डवेअर मध्ये जास्त बदल नाही. त्यामुळे Google Pixel 11 थोडा महाग वाटतो.

बॅटरी सरासरी दिवसभर चालतेमात्र चांगली नाही आणि वायर्ड चार्जिंगही थोडी हळू आहे

Google Pixel 11 चा Tensor G6 प्रोसेसर कॅमेरा आणि AI साठी चांगला आहे मात्र गेमिंग, रॉ परफॉर्मन्स साठी स्नॅपड्रॅगन/ ऍपल चे प्रोसेसर Tensor G6 पेक्षा चांगले ठरू शकतात.

किंमत आणि उपलब्धता

Google Pixel 11 या स्मार्टफोन चा बेस व्हेरियंट ₹89,999 Google ने लॉन्च केलेला आहे. यात 12GB +256GB स्टोरेज व्हेरियंट ची किंमत ₹89,999 आणि 12GB + 512GB स्टोरेज ची किंमत ₹1,04,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे

अंतिम निर्णय

Google Pixel 11 स्मार्टफोन हातात प्रीमियम वाटतो. डिझाइन बाबतीत पण चांगला आहे. Tensor G6 प्रोसेसर आणि Titan M3 सिक्युरीटी चीप सह, 30 तासाचा बॅटरी बॅक अप गूगल क्लेम करतो. साधारण वापरात दिवसभर टिकू शकते रोजची कामे सहज हाताळतो. गेमिंग मध्ये मध्यम फ्रेम रेट वर गेम्स खेळता येतील. स्मार्टफोनच्या बेस व्हेरियंटची किंमत 89,999 आहे. त्यामुळे या किंमत श्रेणीत iQOO 15R किंवा One Plus 15R sarkhe स्मार्टफोन हेवी गेमिंग वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात.

Leave a Comment