Vivo S2 Review: 7050mAh Battery And Mediatek Dimensity 7360 Turbo processor

6.83-इंच, 1.5k 3D कर्व्हड ॲमोलेड (AMOLED) डिस्प्ले

44W फ्लॅश चार्जरसह 7050mAh बॅटरी

MIL-STD-810H लष्करी दर्जाचे प्रमाणपत्र प्राप्त

स्मार्टफोन ब्रँड vivo ने त्याचा S सिरीज मधील स्मार्टफोन vivo S2 भारतीय मार्केटमध्ये सादर केला आहे. S1 सिरीज नंतर आता या वर्षी Vivo S2 सिरीज परत आली आहे. तसेच कंपनीने Vivo S2 स्मार्टफोनच्या डिस्प्ले, डिझाइन आणि बॅटरी यावर भर दिलेला आहे. स्मार्टफोनमध्ये मोठ्या क्षमतेची बॅटरी सह मिडियाटेक डिमेन्सिटी प्रोसेसर आणि Mali G615 MC2 GPU मिळतो. या व्यातिरिक्त 3D कर्व AMOLED पॅनल,अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि स्टिरीओ स्पीकर मिळतात.

भारतात किंमत आणि उपलब्धता,

विवो कंपनीने Vivo S2 स्मार्टफोनचे भारतात UFS 3.1 स्टोरेज सह 128GB आणि 256GB पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. आणि LPDDR4X सह 8GB RAM एकच पर्याय दिला आहे. याशिवाय स्मार्टफोनच्या स्टोरेज व्हेरियंट नुसार किंमत श्रेणी बद्दल माहिती करून घेतली तर, याच्या बेस व्हेरियंटची किंमत 8GB + 128GB ₹39,999 असून 8GB + 256GB ₹44,999 इतकी किंमत भारतात Vivo S2 स्मार्टफोनची आहे.

Vivo S2 स्मार्टफोनची डिस्प्ले, बॅटरी आणि टिकाऊपणा

Vivo S2 स्मार्टफोनच्या डिस्प्ले बद्दल बोलायचे झाल्यास यात 6.83 इंचाचा 1.5k चा AMOLED डिस्प्ले पॅनल दिला असून डिस्प्ले चा स्क्रीन टू बॉडी रेटिओ ( 91.4% ) आहे. स्मार्टफोन मिलिटरी ग्रेड सर्टिफाईड असल्यामुळे डिस्प्ले किरकोळ धक्क्यांचा सामना करू शकतो. तसेच यात स्मूथ स्क्रोलिंग अनुभवासाठी 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000निट्स पीक ब्राईटनेसचा सपोर्ट मिळतो. याशिवाय स्मार्टफोनमध्ये 1260 x 2800 पिक्सेल डिस्प्ले रिसोल्युशन, 20:9 अस्पेक्ट रेसिओ आणि 449 ppi डेन्सिटी, असल्यामुळे व्हिज्युअल शार्प आणि क्लिअर दिसण्यासाठी मदत होते. स्मार्टफोन मध्ये मोठी बॅटरी असुनही 8mm ची जाडी आणि 197g ते 199g इतके वजन आहे

Vivo S2 मध्ये 7050mAh क्षमतेची मोठी बॅटरी मिळते. ज्यामुळे साध्या वापरामध्ये स्मार्टफोनची बॅटरी दिवसभर टिकू शकते. मुळात विवो ने S2 च्या बॅटरीवर विशेष भर दिला आहे. असल्यामुळे बॅटरी ऑप्टिमायझेशन चांगली बघायला मिळते. स्मार्टफोनची बॅटरी लॅब टेस्टनुसार. व्हिडिओ प्लेबॅक 33 तास, म्युझिक 43-44 तास आणि 5G कॉलिंग 49 तास. बॅटरी बॅक अप देऊ शकतो. विवोच्या अधिकृत दाव्यानुसार ही माहिती असून खऱ्या अर्थाने युजरच्या वापरावर बॅटरी बॅक अप अवलंबून असेल. याशिवाय फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंग, रिव्हर्स वायर चार्जिंग आणि बायपास चार्जिंग सपोर्टही दिला आहे.44W च्या चार्जरला 7050mAh बॅटरीचा चार्ज करण्यासाठी ऊपलब्ध माहितीनुसार सुमारे 1 तास 36 मिनिटे लागतात

Vivo S2 स्मार्टफोनच्या टिकाऊपणा बद्दल बोलायचे झाल्यास. तुम्हाला हा स्मार्टफोन MIL-STD-810H मिलिटरी ग्रेड सर्टिफाईड मिळतो. या फोनला धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी,IP68 आणि IP69 ची रेटिंग मिळते. त्यामुळे दीर्घकाळ वापरासाठी स्मार्टफोन उपयुक्त ठरू शकतो.

Vivo S2 कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी

स्मार्टफोनच्या कॅमेरा विषयी माहिती करून घेतली तर यात f/1.8 अपर्चर सह 50 मेगापिक्सेलचा मेन सेन्सर, 2 मेगापिक्सेलचा बोकेह लेन्स देण्यात आला आहे. फोनचा मेन कॅमेरा दिवसा ठीक ठाक सोशल मीडियावर शेअर करता येण्यासारखी फोटो काढून देतो. तसेच सेल्फी घेण्यासाठी f/2.0 अपर्चरचा 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. सेल्फी कॅमेऱ्यामधून चांगले डिटेल्स फोटो कॅप्चर करतो. आणि दोन्ही कॅमेऱ्यामधून 4k 30 FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.

आता स्मार्टफोन च्या कनेक्टिव्हिटी विषयी माहिती बघितली तर या फोनमध्ये ड्युअल बँड Wi-Fi 6, Bluetooth 5.4, USB type-C, GPS आणि 5G मिळतो. आणि Nano SIM+Nano SIM सपोर्ट आहे. हा स्मार्टफोन सॅफायर ब्लू, रीगल ब्रॉन्झ, सिल्क व्हाईट अश्या तीन रंगाचे पर्याय मिळतात.

दमदार ऑपरेटींग सिस्टम आणि मिडीयाटेक डिमेन्सिटी प्रोसेसर

Vivo S2 मध्ये मिडीयाटेक डिमेन्सिटी 7360 टर्बो प्रोसेसर दिला आहे. आणि हा प्रोसेसर 4nm टेक्नोलॉजी वर बनवला असल्यामुळे पॉवर एफिसियंट आहे. BGMI, Genshine Impact सारखे गेम मध्यम सेटिंगवर खेळता येतील. आणि Free Fire Max, COD Mobile असे गेम हाय सेटिंगवर खेळता येऊ शकतात. स्मार्टफोन मल्टी टास्किंग, वेब ब्राउझिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि हलकी गेमिंग साठी हा 760 टर्बो प्रोसेसर सहज हाताळू शकतो. हा फोन ओरिजिन OS 6 वर चालतो.आणि स्मार्टफोन अँड्रॉइड 16 वर रन करतो. कंपनीच्या दाव्यानुसार S2 स्मार्टफोनमध्ये 3 वर्षाचे अँड्रॉइड अपडेट आणि 5 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट मिळतील.

Vivo S2 स्मार्टफोन खरेदी करावा की नाही

Vivo कंपनीने या स्मार्टफोन च्या डिस्प्ले, डिझाइन आणि बॅटरी याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे ज्या वापरकर्त्याचे प्राधान्य रोजची मल्टीटास्किंग नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्म वर कंटेंट बघणे थोडीशी गेमिंग करणे असेल अशांसाठी स्मार्टफोन उपयुक्त ठरू शकतो. आणि ज्या वापरकर्त्याचा लक्ष हेवी गेमिंग दमदार परफॉर्मन्स हवा असेल त्या वापरकर्त्यांनी इतर पर्यायांचाही विचार करावा.

Leave a Comment