Samsung Galaxy A56 Price in India (2026): Latest Price and Storage Variants

जर तुम्ही ₹30,000 ते ₹40,000 च्या बजेटमध्ये Samsung कंपनीचा प्रीमियम स्मार्टफोन शोधत असाल तर Samsung Galaxy A56 चांगला पर्याय ठरू शकतो. या पोस्ट मध्ये स्मार्टफोनची किंमत , फिचर्स , प्रोसेसर, बॅटरी असे बऱ्याच पॉइंट ची माहिती बघणार आहोत

आणि भारतात Samsung Galaxy A56 ची किंमत स्टोरेज व्हेरियंट प्रमाणे किती आहे त्याच्याबद्दल पण माहिती या पोस्ट मध्ये देणार आहे.

Samsung Galaxy A56 Highlights

6.7 inches 120Hz FHD+Super AMOLED Display

Exynos 1580 (4 nm) Processor with Xclipse 540 GPU

One UI 7 with Android 15

5000mAh Battery with 45W Fast Charging Support

Samsung Galaxy A56 price in india

Samsung Galaxy A56 price in india

भारतात Samsung Galaxy A56 या स्मार्टफोन ची किंमत Amazon वेबसाइटनुसार दिली आहे ही किंमत इतर ई-कॉमर्स वेबसाइटवरील ऑफर्सनुसार स्मार्टफोनची किंमत बदलू शकते.

RAM + Storage Current Price (Approx.)
8GB + 128GB ₹31,999
8GB + 256GB ₹35,999 – ₹42,999
12GB + 256GB ₹44,999 – ₹49,999+

Samsung Galaxy A56 Display Specifications

सॅमसंग गॅलेक्सी A56 स्मार्टफोन मध्ये 6.7 इंचाचा Super AMOLED FHD+(1080 x 2340) पिक्सेलची डिस्प्ले मिळते आणि स्मूथ स्क्रोलिंग साठी कंपनीने 120Hz रिफ्रेश रेट दिला आहे. या स्मार्टफोनच्या डिस्प्ले संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टस+ दिलेला आहे याची डिस्प्ले 1200nits (HBM) तसेच 1900nits ची पीक ब्राईटनेस डिस्प्ले मध्ये मिळते आणि स्मार्टफोनमध्ये 87.7% स्क्रीन टू बॉडी रेटिओ मिळतो त्यामुळे डिस्प्ले बघायला आकर्षक आणि प्रीमियम वाटतो.

Samsung Galaxy A56 Processor

Samsung ने आपल्या A56 स्मार्टफोन मध्ये Exynos 1580 (4nm) चा पॉवर एफिसियंट प्रोसेसर दिलेला आहे. आणि 4nm टेक्नॉलॉजीमुळे हा प्रोसेसर बॅटरीचा वापर कमी करण्यास मदत करतो. आणि हा स्मार्टफोन रोजचे टास्क जसे मल्टी टास्किंग नॉर्मल गेमिंग सहज हॅण्डल करू शकतो.

Samsung Galaxy A56 हा स्मार्टफोन BGMI , Call of Duty, Free Fire सारखे गेम मध्यम ते हाय सेटिंगवर स्मूथपणे खेळता येतात. पण हेवी गेम जसे जेनशिन इम्पॅक्ट सारखे गेम जास्त वेळेपर्यंत खेळले तर हीटिंग आणि फ्रेम ड्रॉप सारख्या समस्या अनुभवू शकतात. हा स्मार्टफोन नॉर्मल गेमिंग साठी चांगला पर्याय ठरू शकतो.

Samsung Galaxy A56 Camera specifications

Samsung Galaxy A56 स्मार्टफोन मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. आणि याचा पहिला मेन सेन्सर 50 मेगापिक्सेल OIS कॅमेरा सेन्सर आहे जो f/1.8 अपर्चर चा सेन्सर आहे. आणि हा 50 मेगापिक्सेल चा रिअर कॅमेरा सार्प डिटेल्स आणि वायब्रंट फोटो काढून देतो. आणि लो लाईट मधे पण चांगले फोटो काढू शकतो.

स्मार्टफोन दुसरा कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा आणि हा अल्ट्रा वाईड सेन्सर असून f/2.2 अपर्चर चा आहे आणि हा फील्ड ऑफ व्यू Wide Shots साठी चांगला आहे

आणि तसेच या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सल चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर मिळतो आणि हा f/2.4 अपर्चर चा असून हा कॅमेरा सेन्सर क्लोज-अप फोटो साठी चांगला आहे

Samsung Galaxy A56 Battery And Charging

Samsung Galaxy A56 स्मार्टफोन मध्ये 5000mAh ची लिथियम आयन ची नॉन रेम्यूऍबल बॅटरी दिली आहे. स्मार्टफोन ला हेवी युज केला तर जसे सोसियल मिडिया कॅमेरा गेमिंग व्हिडिओ तर साधारणपणे 6 ते 7 तासांचा Screen-on Time (SOT) मिळू शकतो.

आणि नॉर्मल यूज मध्ये स्मार्टफोन 1.5 दिवस बॅटरी बॅक अप सहज देऊ शकतो. आणि स्मार्टफोन ला चार्ज करण्यासाठी 45W Super Fast Charging 2.0 चार्जिंग सपोर्ट दिला आहे

आणि हा 45W चा चार्जर 60 मिनिटामधे स्मार्टफोनला फुल चार्ज करतो. सॅमसंग कंपनी चार्जर बॉक्समध्ये देत नाही हा चार्जर तुम्हाला स्वतंत्र खरेदी करावा लागतो बॉक्स मध्ये फक्त USB Type-C to Type-C केबल मिळते

तसेच या स्मार्टफोन मध्ये कुठलीही रिव्हर्स चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट कंपनीने दिलेला नाही

Samsung Galaxy A56 RAM And Storage

भारतात Samsung Galaxy A56 हा स्मार्टफोन 8GB + 128GB आणि 8GB + 256GB असे दोन स्टोरेज व्हेरियंट भारतात उपलब्ध आहेत.

तसेच या स्मार्टफोन मध्ये LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 चा स्टोरेज दिलेला आहे. आणि त्यामुळे ऍप जलद गतीने उघडतात मल्टी टास्किंग स्मूथ होते आणि मोठ्या फाईल्स ट्रान्स्फर करत असाल तर डेटा ट्रान्स्फर वेगही चांगला बघायला मिळतो

आणि कंपनीने या स्मार्टफोन मध्ये Micro SD Card सपोर्ट दिलेला नाही म्हणून स्टोरेज वाढवता येत नाही. त्याच्यामुळे मोबाईल खरेदी करताना आपल्या गरजेनुसार स्टोरेज व्हेरियंट निवडणे तुमच्यासाठी योग्य ठरेल

Samsung Galaxy A56 Connectivity Features

स्मार्टफोन मध्ये Wi-Fi 6, Bluetooth 5.3 ,NFC, USB type-C 2.0, 5G Standby Dual SIM support 5G Support Wi-Fi calling सारखे कनेक्टिव्हिटी स्पेसिफिकेशन सॅमसंग गॅलेक्सी A56 मध्ये बघायला मिळतात

Samsung Galaxy A56 Full specifications

Mobile name: Samsung Galaxy A56

Display: 6.7 inches Super AMOLED FHD+, 120Hz Refresh rate Display

Processor: Exynos 1580 4 nm Processor with Xclipse 540 GPU

Battery: 5000mAh Battery And 45W fast charging

Rear Camera: Triple Camera Set Up 50MP OIS Primary Camera + 12MP ultrawide Camera 5MP macro Camera

Front Camera: 12MP Selfie Camera ( f/2.2 )

RAM: 8GB RAM

Storage: 128GB / 256GB

OS: Android 15 with One UI 7 And 6 major Android upgrades

Connectivity: Bluetooth 5.3 , Wi-Fi 6 , NFC , USB type-C 2.0 , Wi-Fi calling , 5G Standby , Dual SIM support , 5G Support

Samsung Galaxy A56 Softwere and Updates

Samsung Galaxy A56 स्मार्टफोन मध्ये 6 वर्षांचे Android OS Updates आणि 6 वर्षांचे Security Updates सॅमसंग ऑफर करतो आणि हा स्मार्टफोन Android 15 आणि One UI 7 सह येतो आणि स्मार्टफोनला 2031 पर्यंत Android upgrades मिळण्याची अपेक्षा आहे म्हणजे आता Android 15 आऊट ऑफ बॉक्स मिळतो तर Android 21 पर्यंत अपडेट मिळतील

Samsung Galaxy A56 Design and Build Quality

Samsung ने A56 मध्ये फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूला गोरिला ग्लास विक्टस+ ची प्रोटेक्शन दिलेली आहे. आणि या स्मार्टफोनची जाडी 7.4 mm आहे स्मार्टफोन ची अल्युमिनियम फ्रेम असल्यामुळे हातात घेतल्यावर प्रीमियम फील देतो आणि स्मार्टफोनचे वजन 198g आहे त्यामुळे डिव्हाईस हातात हलका आणि आरामदायक वाटतो आणि सॅमसंग ने IP67 ची रेटिंग दिली आहे जी डस्ट प्रूफ आहे आणि कंपनीच्या दाव्यानुसार स्मार्टफोन 1.5 मीटर गोड्या पाण्यामध्ये 30 मिनिटापर्यंत राहू शकतो

Samsung Galaxy A56 security Features

Samsung Galaxy A56 मध्ये मजबूत सुरक्षा वैशिष्ट्ये दिलेली आहेत. यामध्ये Face Unlock, In-Display Fingerprint Sensor, आणि PIN, Password, Pattern तसेच Fingerprint यांसारखे विविध बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन आणि लॉक ऑप्शन उपलब्ध आहेत. याशिवाय Secure Folder हे फीचर देण्यात आले आहे, ज्यामध्ये फोटो, व्हिडिओ, फाइल्स आणि ऍप सुरक्षितपणे एन्क्रिप्ट करून ठेवता येतात. फोनमध्ये Samsung Knox हे हार्डवेअर-आधारित सुरक्षा प्लॅटफॉर्म दिले आहे, जो Real-time Protection, Secure Folder आणि Hardware-level Security सारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये देते

Samsung Galaxy A56 Pros & Cons

फायदे

प्रीमियम बिल्ड क्वालिटी आणि दोन्ही बाजूला गोरिला ग्लास विक्टस+ ची प्रोटेक्शन आणि अल्युमिनियम फ्रेम सह IP67 ची रेटिंग मिळते

6.7-इंच super AMOLED, 120Hz डिस्प्ले आणि 1900 nits peak Brightness मिळते.

5000mAh बॅटरी आणि 45W ची फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलेला आहे

6 वर्षाचे Android OS upgrades आणि 6 वर्षाचे security Updates मिळतात

Exynos 1580 प्रोसेसरची चांगली परफॉर्मन्स आणि Samsung Knox security मिळते.

तोटे

Micro SD Card स्लॉट सपोर्ट मिळत नाही त्यामुळे स्टोरेज वाढवता येत नाही

वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळत नाही

चार्जर बॉक्समध्ये मिळत नाही फक्त डेटा केबल बॉक्स मध्ये मिळते

Ultra wide सेन्सर आणि Micro कॅमेरा सेन्सर एव्हरेज मिळतात

Conclusion

जर तुम्ही ₹30,000 ते ₹40,000 च्या बजेटमध्ये प्रीमियम डिझाइन, आणि दीर्घकालीन सॉफ्टवेअर अपडेट्स असलेला स्मार्टफोन शोधत असाल, तर Samsung Galaxy A56 हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. जरी या फोनमध्ये microSD कार्ड स्लॉट, वायरलेस चार्जिंग आणि बॉक्समध्ये चार्जर मिळत नसला, तरी त्याची बिल्ड क्वालिटी, Samsung Knox सुरक्षा, IP67 रेटिंग आणि 6 वर्षांचे Android Updates या गोष्टी त्याला या स्मार्टफोनला त्याच्या किंमत श्रेणीत एक मजबूत पर्याय बनवतात.

FAQ

1.Samsung Galaxy A56 ची भारतातील किंमत किती आहे?

Samsung Galaxy A56 ची भारतातील किंमत स्टोरेज व्हेरियंटनुसार बदलते. 8GB + 128GB व्हेरियंटची किंमत साधारण ₹31,999 पासून सुरू होते, तर 8GB + 256GB व्हेरियंटची किंमत ₹35,999 ते ₹42,999 दरम्यान असू शकते. ऑफर्स आणि ई-कॉमर्स वेबसाइटनुसार किंमतीत बदल होऊ शकतो.

नाही. Samsung Galaxy A56 मध्ये microSD Card स्लॉट दिलेला नाही. त्यामुळे स्टोरेज वाढवता येत नाही. फोन खरेदी करताना आपल्या गरजेनुसार योग्य स्टोरेज व्हेरियंट निवडणे चांगले.

Samsung Galaxy A56 च्या बॉक्समध्ये 45W चार्जर मिळत नाही. बॉक्समध्ये फक्त USB Type-C to Type-C केबल दिली जाते. 45W Super Fast Charger वेगळा खरेदी करावा लागतो.

Samsung Galaxy A56 ला IP67 रेटिंग मिळाली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन धूळरोधक असून कंपनीच्या दाव्यानुसार 1.5 मीटर गोड्या पाण्यात 30 मिनिटांपर्यंत सुरक्षित राहू शकतो. मात्र, समुद्राचे पाणी किंवा इतर द्रवांमध्ये वापरणे टाळावे.

Samsung Galaxy A56 मध्ये Exynos 1580 (4nm) प्रोसेसर असल्यामुळे BGMI, Call of Duty Mobile आणि Free Fire सारखे गेम मध्यम ते उच्च ग्राफिक्स सेटिंगवर चांगले खेळता येतात. मात्र, Genshin Impact सारखे जड गेम दीर्घकाळ खेळल्यास थोडे हीटिंग आणि फ्रेम ड्रॉप जाणवू शकतात.

Samsung Galaxy A56 मध्ये 6 वर्षांचे Android OS अपडेट्स आणि 6 वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतात. Android 15 सह लॉन्च झाल्यामुळे या फोनला भविष्यात Android 21 पर्यंत अपडेट्स मिळण्याची अपेक्षा आहे.

Leave a Comment