iQOO Z11, 1.5K AMOLED Display And 7050mAh battery, Dimensity 7500Turbo Processor

iQOO ने परत एकदा त्याचा मिड रेंज स्मार्टफोन iQOO Z11 भारतीय बाजारपेठेत दाखल केला आहे. यामध्ये MediaTek Dimensity प्रोसेसर आणि 144Hz रिफ्रेश रेटसह, स्टिरीओ स्पीकर मिळतात. 1.5k AMOLED डिस्प्ले सह 7,050mAh ची बॅटरी देण्यात आलेली असून, या पोस्टमध्ये स्मार्टफोन ची वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.

2000 निट्स HBM आणि 3000निट्स पीक ब्राईटनेस

1.5k AMOLED डिस्प्ले सह 144Hz रिफ्रेश रेट

7050mAh बॅटरी आणि सोबत 44W चा फास्ट चार्जर

मिडीयाटेक डिमेन्सिटी 7500टर्बो प्रोसेसर

डिस्प्ले आणि डिझाईन

iQOO Z11 मध्ये प्लास्टिक फ्रेम आणि मागून प्लास्टिक बॅक पॅनल मिळतो. स्मार्टफोन वजन 197ग्रॅम असून याचे आकारमान 164.4 x 75.3, जाडी 8mm आहे आणि डिस्प्ले रिसोल्युशन 1260 x 2800, 450 पीपीआय घनता व 20:9 अस्पेक्ट रेसिओ,91.0% स्क्रीन टू बॉडी रेसिओ मुळे बेझल्स मिनिमल दिसतात त्यामुळे डिस्प्ले बघायला आकर्षक वाटतो. आणि हातात प्रीमियम अनुभव सुद्धा देतो. 197ग्राम मुळे फोन हातात आरामदायक वाटतो. फोनमध्ये 1.5k , 6.83 इंचाचा AMOLED पॅनल मिळतो आणि सोबतच इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सुद्धा दिला आहे. यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट मिळते. 3000 नीट्स पर्यंत पीक ब्राईटनेस आणि 2000 नीट्स HBM हाय ब्राईटनेस मोड मिळतो. त्यामुळे बाहेर प्रकाशातही डिस्प्ले स्पष्ट दिसण्यासाठी मदत होते. स्मार्टफोनला पाणी आणि धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी IP68 आणि IP69 ची रेटिंग मिळते

प्रोसेसर आणि ऑपरेटींग सिस्टम

iQOO च्या या स्मार्टफोन मध्ये मिडीयाटेक डिमेन्सिटी 7500टर्बो प्रोसेसर दिलेला आहे. जो 4nm टेक्नॉलॉजी वर बनवलेला असून, तो पॉवर एफिसियंट आहे.आणि बॅटरीची पॉवर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. हा प्रोसेसर डेलीचे टास्क, मल्टीटास्किंग आणि GPU Mali-G625 MC सह मिड लेव्हलची गेमिंग सहज हाताळू शकतो. iQOO Z11 अँड्रॉइड 16 सह originOS 6 ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करतो. स्मार्टफोन मध्ये कंपनीने 3 वर्षाचे अँड्रॉइड अपडेट आणि 5 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट मिळतील. अशा दावा कंपनीने केला आहे. हा स्मार्टफोन ऑरोरा ग्रीन, सेलेस्टियल ब्लू अशा दोन रंगाच्या पर्यायांमध्ये करून दिला आहे.

कॅमेरा आणि स्पीकर

iQOO Z11 स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअप वर लक्ष दिले, तर याचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर f/1.8 अपर्चर सह 50 मेगापिक्सेलचा (26mm) wide PDAF OIS कॅमेरा आणि सोबतच 8 मेगापिक्सेलचा f/2.2 अपर्चर सह अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळतो. iQOO Z11 च्या 50 मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यामधून चांगले फोटो काढू शकता. डिटेल्स ठीक ठाक मिळतात, कलर्स व्हायब्रंट आणि नैसर्गिक वाटतात. जे सोशल मीडियावर पोस्ट करण्याजोग ठरू शकतात. मात्र अल्ट्रा वाईड सरासरी मिळतो. डिटेल्स कमी आणि लॉ लाइट मध्ये कमकुवत फोटो मिळू शकतात.

याशिवाय सेल्फी घेण्यासाठी यात 32 मेगापिक्सेलचा f/2.0 अपर्चर सह 24mm wide कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फिस चांगले येतात, स्किन टोन नैसर्गिक, अपेक्षापेक्षा चांगले फोटो कॅप्चर करतो. व्हिडिओ कॉल्स आणि सेल्फीसाठी ठीकठाक कॅमेरा आहे. आणि हा फोन रिअर आणि सेल्फी कॅमेऱ्यामधून 4k 30 FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.

iQOO Z11 स्मार्टफोनमध्ये ड्युअल स्टिरीओ स्पीकर मिळतात. आणि 200% वॉल्यूम बूस्ट चे वैशिष्ट्ये पण यामध्ये मिळते.

बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी फिचर्स

iQOO Z11 अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये Li ion ची 7050mAh क्षमतेची मोठी बॅटरी मिळते. स्मार्टफोन 100% चार्ज वर दिवसभराचा बॅटरी बॅक अप देऊ शकतो. iQOO Z11 मध्ये मोठी बॅटरी आणि चांगल्या ऑप्टिमायझेशनमुळे फोनला वेळोवेळी चार्ज करण्याची भिती जाणवत नाही. ही बॅटरी परफॉर्मन्स माहितीनुसार असून, वापरकर्ता स्मार्टफोनला कोणत्या परिस्थितीत किती वेळ वापर करतो. त्याच्यावर बॅटरी बॅक अप अवलंबून आहे. तसेच यात बायपास चार्जिंग आणि रिव्हर्स वायर चार्जिंग सपोर्ट दिलेला आहे.44W चा वायर फ्लॅश चार्जरसह हा 7050mAh बॅटरीला GMSArena नुसार 44%फक्त 30 मिनिटात चार्ज करू शकता

iQOO Z11 चे मुख्य कनेक्टिव्हिटी स्पेसिफिकेशन बघितले.तर यात Wi-Fi 6, Bluetooth 5.4, Dual Nano SIM + Nano SIM , 5G सपोर्ट, IR Blaster आणि USB type-C 2.0, 5G + 5G Standby अशा कनेक्टिव्हिटी सपोर्टसह हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे.

स्टोरेज, किंमत आणि उपलब्धता

iQOO Z11 मध्ये LPDDR54X सह 6GB ते 12GB पर्यंत रॅम प्रकार उपलब्ध आहेत. आणि UFS 3.1 सह 128GB ते 256GB पर्यंत iQOO Z11 चे स्टोरेज पर्याय उपलब्धआहेत. स्मार्टफोनच्या बेस व्हेरियंट ची किंमत बघितली तर 6GB +128GB ₹34,999 ,8GB + 128GB ₹39,999 , 8GB + 256GB ₹44,999 आणि 12GB + 256GB स्टोरेज व्हेरियंट ची किंमत ₹49,999 इतकी आहे

iQOO Z11 स्मार्टफोनची सेल दुपारी 12 वाजता पासून 25 ऑगस्ट 2026 रोजी अमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट आणि इतर स्टोअर वर सुरू होणार असल्याची घोषणा झाली आहे. माहितीनुसार 6 महिन्यापर्यंत No cost EMI आणि 3000 पर्यंत बँक डिस्काउंट निवडक कार्डवर मिळू शकतो.

iQOO Z11 स्मार्टफोन खरेदी करावा की नाही

iQOO Z11 मध्ये 1.5K AMOLED डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट, 7050mAh बॅटरी आणि Dimensity 7500 टर्बो प्रोसेसर यांचे चांगले संयोजन मिळते. त्यामुळे डिस्प्ले बॅटरी लाइफ आणि रोजच्या परफॉर्मन्सला प्राधान्य देणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा स्मार्टफोन आकर्षक पर्याय ठरू शकतो. मात्र या किंमत श्रेणीत हेवी गेमिंग किंवा कॅमेरा परफॉर्मन्सला प्राधान्य देणाऱ्या वापरकर्त्यांनी इतर स्मार्टफोन पर्यायांचा चाही विचार करू शकता.

Leave a Comment