Samsung Galaxy F70 Pro 5G: What Do You Get for ₹25,999?

सॅमसंग कंपनीने लाँच केला अजून एक नवीन बजेट स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे. स्मार्टफोन मध्ये Snapdragon 5G प्रोसेसर, 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले, आणि मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आली आहे. या पोस्टमार्फतSamsung Galexy F70 Pro विषयी सविस्त माहिती जाणून घेणार आहोत.

6.7 inches Super AMOLED Display with 120Hz Refresh rate

Snapdragon 6 Gen 3 (4nm) Processor

6000mAh Battery with 45W Fast Charger

Bypass charging support

डिझाइन आणि बांधणीचा दर्जा

Samsung Galaxy F70 Pro स्मार्टफोनमध्ये पॉलीकार्बोनेट फ्रेम आणि मागून ग्लास बॅक मिळतो. तसेच दोन्ही बाजूंना सुरक्षित ठेवण्यासाठी गोरिला ग्लास विक्टस प्लस चे संरक्षण मिळते. तसेच 162.4 x 78.2 डिमेन्शन, 8.1mm जाडी आणि 206g वजन चांगले डिस्ट्रिबुट केले आहे, स्मार्टफोन हातात भक्कम आणि प्रीमियम अनुभव देतो. याशिवाय स्मार्टफोनमध्ये Aura Green आणि Alpha Black दोन प्रकारचे कलर पर्याय उपलब्ध आहेत.

Samsung Galaxy F70 Pro मध्ये IP64 ची सर्टिफिकेशन मिळते. स्मार्टफोन घट्ट धुळीच्या कणांपासून आणि पाण्याच्या छटांपासून सुरक्षित राहतो.

शक्तिशाली स्नॅपड्रॅगन प्रोसेसर

स्मार्टफोन ला रोजच्या वापरासाठी पॉवर देण्यासाठी Samsung Galaxy F70 Pro मध्ये स्नॅपड्रॅगन 6 Gen 3 5G प्रोसेसर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये रोजची मल्टीटास्किंग, ब्राउझिंग, गेमिंगसाठी, सक्षम आहे. स्मार्टफोन डेली यूज साठी चांगला पर्याय ठरू शकतो. तसेच GPU Adreno 710 दिला आहे. त्यामुळे गेमिंग प्रेमींसाठी आवश्यक ग्राफिक्स परफॉर्मन्स परफॉर्मन्स मिळू शकतो.

BGMI,COD Mobile, Genshin Impact, सारखे गेम मध्यम सेटिंगवर खेळता येऊ शकतात.
हा स्मार्टफोन गेमिंग केंद्रित नाही. त्यामुळे गेमिंग प्रेमींना इतर स्मार्टफोन पर्यायांचा विचार करावा लागू शकतो

6000mAh बॅटरी

Samsung Galaxy F70 Pro स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी मिळते. तसेच यात बायपास चार्जिंग सपोर्टही दिल्यामुळे चार्जिंगला लावून मोबाईल वापरताना पॉवर थेट प्रोसेसर कडे जाते. त्यामुळे बॅटरीवरचा लोड आणि हीट कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. हा फोन दैनंदिन वापरात यूट्यूब, सोशल मीडिया, ब्राउझिंग,हलकी गेमिंग केली तर 7 ते 8 तासाचा स्क्रीन ऑन टाईम देतो. साध्या वापरामध्ये स्मार्टफोनची उपलब्ध माहितीनुसार बॅटरी 1.5 दिवस चालते. स्मार्टफोनला फास्ट चार्ज करण्यासाठी 45W चार्जिंग सपोर्ट दिला आहे. बॉक्समध्ये कंपनी स्मार्टफोनचा चार्जर देत नाही. त्यामुळे तो ग्राहकाला स्वतंत्र खरेदी करावा लागतो.

50MP OIS कॅमेरा

Samsung Galaxy F70 Pro

स्मार्टफोनच्या कॅमेऱ्या बद्दल बोलायचे झाल्यास यात तीन कॅमेरा सेटअप दिलेला आहे. स्मार्टफोनचा पहिला मेन सेन्सर 50 मेगापिक्सेलचा f/1.8 अपर्चर सह PDAF OIS कॅमेरा आहे. दिवसा कॅमेरा परफॉर्मन्स चांगला आहे चांगले डिटेल्स आणि नैसर्गिक रंगासह फोटो काढून देतो. स्मार्टफोन मध्यम प्रकाशात संतुलित फोटो काढतो, पण samsung च्या One UI प्रोसेसिंगमुळे फोटो चांगले दिसतात. तसेच OIS मुळे फोटो आणि व्हिडीओ स्थिर मिळतात. याशिवाय यात 5 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड कॅमेरा कमी डिटेल्स कॅप्चर करतो, लो लाईट मधे गुणवत्ता कमकुवत बघायला मिळते. 2 मेगापिक्सेल चा मायक्रो कॅमेरा आहे. समोरचे शॉट्स घेता येतील तरी सुद्धा मायक्रो कॅमेऱ्याची अपेक्षा कमी ठेवा.

समोरच्या बाजूला सेल्फीसाठी f/2.2 अपर्चर सह 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. चांगला स्किन टोन आणि डिटेल्स फोटो कॅप्चर करतो.

स्मार्टफोन व्हिडिओ रेकॉडिंगला 4K/30 FPS आणि 1080/30 FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. तसेच समोरच्या कॅमेऱ्याने 1080p/30 FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करतो

ऑपरेटिंग सिस्टम

Samsung Galaxy F70 Pro हा अँड्रॉइड 16 वर आधारित One UI 8.5 वर चालतो. स्मार्टफोन मधील One UI सॉफ्टवेअर स्मूथ, क्लीन आणि प्रीमियम अनुभव देतो. सोबतच 6 वर्षाचे अँड्रॉइड अपडेट आणि 6 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट सॅमसंग ऑफर करतो. त्यामुळे Samsung Galaxy F70 Pro दीर्घकाळ वापरासाठी चांगला पर्याय बनतो.

कनेक्टिव्हिटी

Samsung Galaxy F70 Pro 5G स्मार्टफोनमध्ये Wi-Fi 5, Bluetooth 5.1, कॉन्टॅक्टलेस पेमेंट साठी NFC, USB Type-C 2.0,GPS, OTG सारखे कनेक्टिव्हिटी पर्याय मिळतात. त्यामुळे रोजच्या वापरासाठी स्मार्टफोनची कनेक्टिव्हिटी पुरेशी सक्षम ठरू शकते.

मात्र या स्मार्टफोनमध्ये IR Blaster, 3.5mm जॅक आणि FM Redio उपलब्ध नाहीत

AI आणि इतर वैशिष्ट्ये

Samsung Galaxy F70 Pro स्मार्टफोनमध्ये AI ची फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास. यात Samsung चा Galaxy AI मिळतो .Object Eraser, circle to search,AI Transcript, सारखे फिचर्स रोजच्या वापरासाठी उपयुक्त ठरू शकतात.

स्मार्टफोनमध्ये. सुरक्षितेसाठी Samsung Knox सिक्युरिटी मिळते. हा युजरच्या पर्सनल डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करतो. तसेच साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, लाऊड स्पीकर असे इतर फिचर्सही मिळतात.

फायदे आणि तोटे

या स्मार्टफोनचे फायदे आणि तोटे तुम्हाला खाली दिले आहेत. त्यामुळे खरेदीदार त्याच्या बजेट आणि गरजेनुसार स्मार्टफोनची तुलना करू शकतो

फायदे

6.7 इंचाचा Super AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळतो.

6000mAh बॅटरीसह 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

दीर्घकाळ ( 6 + 6 )सॉफ्टवेअर अपडेट्स आणि सिक्युरिटी अपडेट मिळतात.

Galexy AI, Circle to Search AI Transcript सारखी AI वैशिष्ट्ये स्मार्टफोन मध्ये आहेत. रोजच्या वापरासाठी उपयुक्त ठरू शकतील.

तोटे

45W ची फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळते पण चार्जर बॉक्समध्ये मिळत नाही.

स्मार्टफोनचा अल्ट्रावाईड कॅमेरा कमकुवत, डिटेल्स कमी बघायला मिळू शकतात.

स्नॅपड्रॅगन 6 Gen 3 हेवी गेमिंगसाठी मर्यादित

मागून ग्लास बॅक असूनही प्लास्टिक फ्रेम मिळते.

किंमत आणि उपलब्धता

सॅमसंगच्या या स्मार्टफोन बद्दल किंमत तपशील विषयी माहिती जाणून घेतली तर सध्या Amzone.in वर याच्या बेस व्हेरियंट ची किंमत 6GB + 128GB ₹25,999, 8GB + 128GB ₹29,999 आणि 8GB + 256GB ₹34,999 आहे. तसेच बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनससह ग्राहकांना प्रभावी किंमतीत सूट मिळू शकते.

अंतिम विचार

स्मार्टफोन विषयी थोडक्यात सांगायचे झाले तर यात 6000mAh बॅटरी आणि 45W चार्जिंग सपोर्ट मिळतो. स्नॅपड्रॅगन 6 Gen 3 प्रोसेसर, जो 4nm टेक्नॉलॉजी वर आधारित आहे. तसेच 120Hz रिफ्रेश रेट आणि 6.7 इंचाचा Super AMOLED डिस्प्ले मिळतो. हा स्मार्टफोन सोशल मीडिया मल्टीटास्किंग, युट्यूब वर व्हिडिओ पाहणे. हलक्या गेमिंगसाठी पुरेशा सक्षम आहे. ज्या वापरकर्त्यांना दिवसभर टिकणारी बॅटरी , AMOLED डिस्प्ले आणि सॅमसंग चा बजेट मध्ये स्मार्टफोन हवा असणाऱ्या वापरकर्त्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो

Leave a Comment