Motorola ने भारतीय बाजारात नवीन Motorola G77 Power स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 7000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले, MediaTek Dimensity 6400 प्रोसेसर आणि 50MP OIS कॅमेरा मिळतो. या लेखात किंमत, फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, Pros & Cons आणि हा फोन खरेदी करावा की नाही याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Motorola G77 Power Highlights
- 6.72inch FHD+ 120Hz IPS LCD Display
- MediaTek Dimensity 6400 (6nm) Octa-core Processor
- Corning Gorilla Glass 7i protection
- 7000mAh Battery with 30W Turbo wired charging support
Motorola G77 Power launch Date in india
Moto G77 Power हा स्मार्टफोन भारतात 8 जुलै 2026रोजी अधिकृतपणे लाँच करण्यात आला. कंपनीनुसार या स्मार्टफोन ची पहिली विक्री आणि सेल 13 जुलै 2026 रोजी सुरू होणार.असे स्मार्टफोन कंपनीने जाहीर केले आहे.
Motorola G77 Power price in india
Motorola G77 Power ची किंमत भारतात सुमारे ₹25,999 इतकी आहे लॉन्चच्या वेळी घोषित करण्यात आली होती. पण 13 जुलै 2026 ला स्मार्टफोन ची सेल सुरू होणार असून स्मार्टफोनची किंमत बँक डिस्काउंट सह ₹23,999 इतकी कमी होवू शकते. सुमारे ₹2000 सूट ग्राहकांना मिळू शकते.
Motorola G77 Power Display Specifications
Motorola G77 Power मध्ये 6.72-इंचाचा Full HD+ IPS LCD डिस्प्ले, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो.HBM मोडमध्ये 1,050 निट्स ब्राइटनेस मिळतो. त्यामुळे बाहेर मोबाईल वापरताना उन्हात डिस्प्ले स्पष्ट दिसते.डिस्प्ले च्या 120Hz रिफ्रेश रेटमुळे स्क्रोलिंग,ॲनिमेशन आणि गेमिंग अनुभव स्मूथ वाटतो आणि स्मार्टफोनच्या डिस्प्ले संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिला ग्लास 7i दिलेला आहे.
या डिस्प्लेची आऊट डोअर दृश्यात ठीक आहे आणि Full HD+ रिसोल्युशन असल्यामुळे डिटेल्स शार्प आणि क्लीन दिसतात. पण ही डिस्प्ले IPS LCD असल्यामुळे OLED/AMOLED डिस्प्ले सारखे deep black,vibrant colors मिळत नाही. पण हो या प्राइस रेंजमध्ये (₹ 25,999 ) मध्ये एक चांगला पर्याय ठरू शकतो.
Motorola G77 Power Processor & Performance
स्मार्टफोन मध्ये मिडियाटेक डिमेन्सिटी 6400 (6nm) Octa-core प्रोसेसर आहे. स्मार्टफोन रोजच्या वापरासाठी WhatsApp, social media, YouTube,आणि multi tascking साठी स्मूथ काम करतो. आणि ग्राफिक्स साठी.Mali-G57 MC2 GPU दिला आहे. जो ( BGMI , COD mobile) सारखे गेम मध्यम सेटिंगवर चांगले चालवू शकतो. स्मार्टफोन दीर्घकाळ हेवी गेमिंग करताना फोन थोडा गरम होऊ शकतो. पण 120Hz डिस्प्ले मुळे साधा अनुभव मिळू शकतो.
बघितले तर स्मार्टफोन फ्लॉग्शिप लेवलची परफॉर्मन्स देऊ शकत नाही. पण (₹ 25,999) या सेगमेंट मध्ये प्रोसेसर बॅलन्स आणि एफिसियंट आहे
Motorola G77 Power Camera Specifications
नवीन लाँच झालेला स्मार्टफोन Motorola G77 Power मध्ये मागच्या बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. त्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा f/1.8 अपर्चर सह (PDAF,OIS) कॅमेरा आहे.आणि f/2.2 अपर्चर सह 8 मेगापिक्सेल चा Ultrawide कॅमेरा आहे.
सेल्फीसाठी स्मार्टफोनचा पुढील कॅमेरा f/2.2 अपर्चर सह 32 मेगापिक्सेलचा आहे. जो चांगल्या तपशील सेल्फी देतो. बघितलं तर स्मार्टफोनचा 50 मेगापिक्सेल चा कॅमेरा (₹25,999) च्या किंमत श्रेणीत हा कॅमेरा चांगली फोटो गुणवत्ता देतो. फ्लाग्शिप लेवलचा नाहीण पण रोजच्या फोटोग्राफी साठी चांगला आहे
फोनची व्हिडीओ रेकॉडिंग बघितली तर 50 मेगापिक्सेल OIS कॅमेरा मधून 1080p/30/60 FPS आणि मॅक्स 1440p/30 FPS पर्यंत रेकॉर्ड करतो. आणि फोनचा पुढील कॅमेरा सुद्धा याचं सेटिंग रिसोल्युशन वर रेकॉर्ड करतो. फक्त फोनचा एकच कॅमेरा 1080p/60 FPS रेकॉर्ड करत नाही.
Motorola G77 Power Battery And Charging
Motorola G77 Power या मोबाईल फोन मध्ये मोठी बॅटरी दिली आहे जी 7000mAh ची लिथियम पॉलिमर बॅटरी आहे. स्मार्टफोन नॉर्मल वापर केला जसे सोशल मीडिया मल्टी टास्किंग नॉर्मल गेमिंग आणि व्हिडिओ तर साधारणपणे याची बॅटरी 10 ते 11 तासाचा स्क्रीन ऑन टाईम कंपनीच्या दाव्यानुसार देऊ शकतो आणि हा टाइम पिरियड प्रत्यक्ष वापरा नुसार बदलू शकतो.
जर हेवी गेमिंग केली तर 7 ते 8 तास चालू शकतो. पण हेवी गेमिंग मध्ये FPS ड्रॉप अनुभवू शकतात. तसेच 7000mAh बॅटरी ला चार्ज करण्यासाठी कंपनीने 30W ची Turbo power वायर्ड चार्जिंग सपोर्ट दिला आहे जो स्मार्टफोनला चार्ज करण्यासाठीसाधारणपणे 1 तास 15 ते 20 मिनिटे लागतात. आणि वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट उपलब्ध नाही
Motorola G77 Power Connectivity Specifications
स्मार्टफोनचे कनेक्टिव्हिटी फिचर्स कंपनीने चांगले दिले आहेत फक्त एक गोष्टीची कमी आहे. भारतीय व्हेरियंत मध्ये NFC मिळत नाही बाकी स्मार्टफोन मध्ये सगळे फिचर्स उपलब्ध आहेत आणि दोन एक्स्ट्रा फिचर्स सुद्धा आहेत. Bluetooth 5.4,5G Support, Wi-Fi 5, OTG Support, आणि याच्यात FM Redio आणि 3.5mm Jack पण मिळतो, तसेच USB type-C , GPS असे कनेक्टिव्हिटी फिचर्स Motorola G77 Power स्मार्टफोन मध्ये मिळतात.
Motorola G77 Power RAM & Storage
कंपनीने हा स्मार्टफोन बजेट फोन म्हणून सादर केला आहे. या फोनचा एकच रॅम आणि स्टोरेज कंपनीने भारतात लाँच केला आहे. 8GB LPDDR4X RAM आणि UFS 2.2 128GB Storage आणि फोन मध्ये microSD कार्ड सपोर्ट पण दिला आहे ज्यामुळे 1TB पर्यंत स्टोरेज एक्स्पांड करता येतो. तसेच वर्चुअल रॅम सपोर्ट दिला आहे. ज्यामुळे स्मार्टफोन चा RAM Boost करता येतो.
Motorola G77 Power AI features
एक नजर नवीन लाँच झालेला Motorola G77 Power च्या AI फिचर्स वर टाकूया. स्मार्टफोन मध्ये रोजच्या वापरामध्ये येतील असे AI फिचर्स कंपनीने दिलेली आहेत. जास्त अँडव्हान्स फिचर्स कंपनीने दिले. नाहीत पण बेसिक AI फिचर्स मिळतात जे रोजची फोटोग्राफी आणि परफॉर्मन्स सुधारण्यास मदत करतात.
स्मार्टफोन मधली AI फिचर्स Photo Enhancement, या फिचर्स मुळे फोटो कॅमेऱ्यामधून काढला तर या फिचर्स चा वापर करून आपोआप फोटो इम्प्रोव करता येतो जसे की कलर, ब्राईटनेस आणि नॉईस रेडूक्शन. याच्याने फोटो इम्प्रोव करता येतो.
दुसरा फिचर्स आहे Object Eraser याच्याने फोटो मधील नको असलेला भाग काढता येतो. जसे की साईड ला एक व्यक्ती असेल आणि ती फोटो मधून काढून टाकायची असेल तर या फिचर्स मुळे त्या व्यक्तीला फोटो मधून सहज काढू शकता.
Smart Auto Enhance हा फिचर्स फोटोला आकर्षक, सुंदर आणि नैसर्गिक लुक देण्याचे काम करतो. थोडा कलर ग्रेड सारखा हा फिचर्स आहे हा ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट, सार्पनेस आपोआप ऍडजस्ट करतो.
AI Camera Modes या AI कॅमेरा मोडचे काम पोर्ट्रेट मोड मध्ये बॅकराऊंड ब्लर करण्या साठी मदत करतो हा फिचर्स आणि Night Mode optimization आणि scene detection असे फिचर्स कॅमेरा मोड मध्ये आहेत. असे AI फिचर्स Motorola G77 Power मध्ये मिळतात
Motorola G77 Power Pros and Cons
Pros
- 7000mAh मोठी बॅटरी मिळते जी साध्या वापरामध्ये 2 दिवसांचा बॅटरी बॅकअप देतो.
- MediaTek Dimensity 6400 प्रोसेसरमुळे दैनंदिन वापर आणि मध्यम गेमिंगसाठी चांगला परफॉर्मन्स.
- 6.72-इंच FHD+ 120Hz डिस्प्लेमुळे स्मूथ स्क्रोलिंग.
- IP64 रेटिंग आणि MIL-STD-810H टिकाऊपणा सह.
- Hello UI (Android 16 आधारित) Stock Android अनुभव मिळतो.
- Stereo Speakers आणि Dolby Atmos सपोर्ट मिळतो.
- Corning Gorilla Glass 7i डिस्प्ले प्रोटेक्शन मिळते.
Cons
- NFC मिळत नाही या किंमत श्रेणीत NFC मिळायची आशा होती. या किंमत श्रेणीत बऱ्याच स्मार्टफोन मध्ये NFC सपोर्ट मिळतो.
- 25,999 च्या किंमत श्रेणीत काही स्पर्धक स्मार्टफोन UFS 3.1 स्टोरेज देतात.
- वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळत नाही
- फक्त 1 वर्षाचा Android updates मिळतो बाकीचे स्मार्टफोन कंपनी 2 वर्ष तरी OS अपडेट्स देतात.
- या किंमत श्रेणीत फक्त 30W ची चार्जिंग सपोर्ट मिळतो. या किंमतीत 68W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळाला असता तर स्मार्टफोन व्हॅल्यू फॉर मनी पर्याय बनला असता.
Conclusion
Motorola G77 Power हा ₹25,999 किंमत श्रेणीतील संतुलित स्मार्टफोन आहे. 7000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले, Dimensity 6400 प्रोसेसर आणि स्वच्छ Hello UI यामुळे हा फोन दैनंदिन वापर, मल्टीटास्किंग आणि मध्यम गेमिंगसाठी चांगला पर्याय ठरतो. मात्र AMOLED डिस्प्ले, UFS 3.1 स्टोरेज, जलद चार्जिंग आणि अधिक Android अपडेट्स हवे असतील तर इतर पर्यायांचाही विचार करता येईल.
तुमच्या मते हा स्मार्टफोन 25,999 मध्ये हा फोन चांगला पर्याय आहे का. खाली कमेंट करून नक्की सांगा आणि असाच स्मार्टफोन अपडेट्स साठी Mobileteck.com साईटला भेट देत राहा.
1. Motorola G77 Power ची भारतातील किंमत किती आहे?
Motorola G77 Power ची लॉन्च किंमत भारतात ₹25,999 आहे. बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरनुसार किंमत सुमारे ₹23,999 पर्यंत कमी होऊ शकते.
2. Motorola G77 Power मध्ये कोणता प्रोसेसर मिळतो?
या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6400 (6nm) Octa-core प्रोसेसर आणि Mali-G57 MC2 GPU मिळतो. हा प्रोसेसर दैनंदिन वापर, मल्टीटास्किंग आणि मध्यम स्तरावरील गेमिंगसाठी योग्य आहे.
3. Motorola G77 Power मध्ये AMOLED डिस्प्ले आहे का?
नाही. या स्मार्टफोनमध्ये 6.72-इंचाचा Full HD+ IPS LCD डिस्प्ले असून तो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो.
4. Motorola G77 Power ची बॅटरी किती आहे?
या फोनमध्ये 7000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. सामान्य वापरात ती साधारण 2 दिवसांचा बॅकअप देऊ शकते. प्रत्यक्ष बॅटरी बॅकअप वापराच्या पद्धतीनुसार बदलू शकतो.
5. Motorola G77 Power मध्ये फास्ट चार्जिंग मिळते का?
होय. या स्मार्टफोनमध्ये 30W TurboPower वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. मात्र वायरलेस चार्जिंग उपलब्ध नाही.