iPhone 15 Review 2026: Is it still worth buying for ₹58,900?

iPhone 15 हा स्मार्टफोन 2026 मध्ये खरेदी करण्यासाठी योग्य पर्याय ठरेल का? आणि iPhone 16,17Pro, 17 Pro Max हे सिरीज लाँच झाल्यानंतर iPhone 15 ग्राहकांना फायदेशीर ठरेल का, आता 60 हजारात बरेच स्मार्टफोन लाँच झाले आहेत आणि iPhone 15 सध्याची किंमत 58,900 आहे तर ग्राहकांनी नवीन स्मार्टफोन कडे लक्ष द्यावे की अजून पण iPhone 15 खरेदी करण्यासारखा पर्याय आहे. या पोस्ट मार्फत iPhone 15 चे स्पेसिफिकेशन,परफॉर्मन्स, बॅटरी, कॅमेरा विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत

  • 6.1 inches Super Retina XDR OLED Display
  • 60Hz Refresh rate
  • A16 Bionic ( 4nm ) Processor
  • Li-ion 3349mAh Battery with 20W fast charging support
  • 48MP Maine Camera + 12MP Ultra-wide + 12MP Selfie Camera
  • USB Type-C 2.0
  • IP68 And Ceramic Shield glass Protection

Design & Build Quality

iPhone 15 मध्ये अल्युमिनियम फ्रेम आणि मागून ग्लास बॅक मिळतो. iPhone 15 ची 7.8mm ची जाडी आणि 171g इतके वजन असल्याने स्मार्टफोन हातात जास्त जाड आणि जास्त वजन ही वाटत नाही. हातात हलका वाटतो. आणि स्मार्टफोनला जास्त वेळ धरून ठेवल्यावरही थकवा जाणवत नाही. iPhone 15 ची लांबी 147.6 x रुंदी 71.6 आहे.

iPhone 15 ला पाणी आणि धुळीपासून संरक्षणसाठी यात IP68 ची सर्टिफिकेशन मिळते. iPhone 15 चा डिझाईन 2026 मध्ये कसा वाटतो? 2026 मध्ये ही स्मार्टफोन प्रीमियम आणि आकर्षक अनुभव देतो. स्मार्टफोन चे हलके वजन आणि गोल कडा असल्यामुळे iPhone 15 हातात चांगला अनुभव देतो

iPhone 15 Display

iPhone 15 ची डिस्प्ले स्पेसिफिकेशन बघितले तर यात 6.1 इंचाचा Super Retina XDR OLED डिस्प्ले आहे. तसेच यात 60Hz रिफ्रेश रेट मिळतो. बाकी 1000 nits पर्यंत HBM हाय ब्राईटनेस मोड आणि 2000nits पीक ब्राईटनेस मिळते. ही डिस्प्ले बाहेर सूर्यप्रकाशात सुद्धा चांगली स्पष्ट दिसते. तसंच स्मार्टफोनच्या डिस्प्ले संरक्षणासाठी यात Ceramic Shield glass Protection दिले आहे. स्मार्टफोन मध्ये 86.4% Screen to body ratio असल्यामुळे डिस्प्लेचे बेजल्स पातळ दिसतात आणि त्यामुळे डिस्प्ले आकर्षक दिसतो, iPhone 15 मध्ये 1179 x 2556 पिक्सेल इतकी डिस्प्ले रिसोल्युशन आहे आणि 19.5:9 ratio मिळतो. या डिस्प्ले मध्ये HDR 10 आणि Dolby vision मिळते त्यामुळे व्हिडिओ, सिनेमा पाहायला चांगला अनुभव मिळतो

Performance – A16 Bionic

iPhone 15 मध्ये A16 Bionic प्रोसेसर मिळतो जो 4nm टेक्नॉलॉजी वर आधारित असून पॉवर एफिसियंट देखील आहे. त्यामुळे बॅटरीची ऊर्जा वापर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. दैनंदिन मल्टीटास्किंग, गेमिंग,ब्राउझिंग, सोशल मीडिया फोन सहज हाताळतो. BGMI COD Mobile Free Fire Max सारखे गेम मध्यम ते उच्च सेटींगवर खेळता येतात. तसेच Apple चा थर्मल मॅनेजमेंट चांगली आहे, पण दीर्घकाळ वापरल्यास हीटिंग सारख्या समस्या जाणवू शकतात.

iPhone 15 डेली यूज + गेमिंगसाठी 58,900 हजारात पुरेशा परफॉर्मन्स देतो.तसेच 2026 मध्ये अजूनही सक्षम आहे. त्यामुळे गेमिंग आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो

iPhone 15 Camera Review

iPhone 15 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो याचा प्रायमरी सेन्सर f/1.6अपर्चरसह 48 मेगापिक्सेलचा आहे. तसेच iPhone 15 ची Daylight: फोटोग्राफी खूप चांगले डिटेल्स, कलर्स आणि एक्सपोजर चांगला हॅण्डल करतो. याशिवाय Dynamic range मध्ये चांगले ब्राईट आणि डार्क भाग स्मार्टफोन चांगले हॅण्डल करतो. आणि skin tones: नैसर्गिक आणि आकर्षक येतात. iPhone 15 ची Detail बघितली तर 24MP डिफॉल्ट मोडमध्ये मध्ये चांगले डिटेल्स आणि 48MP मध्ये अजून जास्त डिटेल्स कॅप्चर होतात

iPhone 15 cha Ultra wide कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा आहे. हा कॅमेरा दिवसा ठीक आणि पूर्ण फ्रेम मध्ये डिटेल्स थोडे एव्हरेज मिळतात. तसेच lowlight फोटोग्राफीमध्ये नॉईस जास्त येतो थोडे विक आणि डिटेल्स कमी होतात.

या स्मार्टफोनचा पोर्ट्रेट मोड अचूक एज डिटेक्शन करतो आणि स्किन टोन नैसर्गिक व सुंदर येतात.याशिवाय स्मार्टफोनचा Night मोड मेन कॅमेऱ्यावर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो डिटेल्स चांगले राहतात. आणि एक्सपोजर जास्त ब्राईट किंवा डार्क हॉट नाहीत व संतुलित राहतात.

यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग स्मार्टफोन f/1.9 अपर्चर सह 12 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. याच्या सेल्फी कॅमेरा Daylight फोटोग्राफी मध्ये चांगले डिटेल्स फोटो काढून देतो.आणि हा कॅमेरा 4K 30/60 FPS व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो

iPhone 15 चा रिअर कॅमेऱ्यामधून 4k 30 60 FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. Dolby vision सह चांगल्या गुणवत्तेचे व्हिडिओ रेकॉर्ड करता येतात. याशिवाय याचा Cinematic mode चांगला काम करतो व डेप्थ इफेक्ट नैसर्गिक वाटतो.

iPhone 15 चा कॅमेरा 2026 मध्येही फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीमध्ये चांगली कामगिरी करतो.ज्या वापरकर्त्यांना फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायला आवडते. व्हिडिओची गुणवत्ता,नैसर्गिक कलर्स आणि चांगले डिटेल्स मिळतात. म्हणून 2026 मध्ये हा स्मार्टफोन फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी अजूनही चांगला पर्याय ठरू शकतो

Battery & Charging

iPhone 15 मध्ये 3349 mAh बॅटरी मिळते. ही बॅटरी अँड्रॉइड स्मार्टफोन पेक्षा तुलनेने कमी आहे. तरी सुद्धा याची बॅटरी सामान्य आणि मध्यम वापरात संध्याकाळ पर्यंत चालू शकते. याशिवाय स्मार्टफोन हेवी वापर+ गेमिंग केली तर मधेच फोन चार्ज करावा लागू शकतो. iPhone 15 मध्ये 20W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. उपलब्ध माहितीनुसार 0 ते 50% चार्जिंग 30 मिनिटात होते.
iOS च्या ऑप्टिमाझेशनमुळे स्मार्टफोनचा बॅटरी मॅनेजमेंट चांगला आहे. त्यामुळे लहान बॅटरी असुनही बॅटरी चांगली टिकते. याशिवाय स्मार्टफोनमध्ये 15W ची magsafe चार्जिंग सपोर्ट आणि 4.5 रिव्हर्स वायर चार्जिंग सपोर्ट पण मिळतो.

थोडक्यात सांगायचे तर iPhone 15 ची बॅटरी 2026 मध्येही चांगली कामगिरी बघायला मिळते. स्मार्टफोन हलक्या वापरात पूर्ण दिवसभर चालतो. हा स्मार्टफोन नॉर्मल गेमिंग आणि हलकी मल्टी टास्किंग युजर साठी चांगला पर्याय ठरू शकतो

Software & Updates

iPhone 15 सॉफ्टवेअर आणि अपडेट्स साठी अजूनही मजबूत पर्याय आहे. हा स्मार्टफोन सध्या उपलब्ध माहिती नुसार ( iOS 26.6.) वर चालत आहे.तसेच iOS ची ऑप्टिमायझेशन खूप चांगली असल्यामुळे स्मार्टफोन स्मूथ आणि स्थिर राहतो. याशिवाय स्मार्टफोनमध्ये बहुतेक AI फिचर्स मिळतात, पण काही अँडव्हान्स फिचर्स Apple intelligence सारखे फिचर्स A17 Pro आणि नंतरच्या चिप्ससाठी मर्यादित आहेत.

Apple दर वर्षी मोठे iOS अपडेट्स देतो आणि स्मार्टफोनला सिक्युरिटी अपडेट्स नियमित मिळतात. तसेच Apple 3 ते 5 वर्षे सपोर्ट किंवा त्यापेक्षा जास्त अपडेट्स मिळू शकतात. आणि iPhone 15 ची सध्याची सॉफ्टवेअर सपोर्ट आणि A16 Bionic ची क्षमता पाहता स्मार्टफोन अजून पुढील काही वर्षे वापरण्यासाठी सक्षम राहू शकतो.

Connectivity & Features

iPhone 15 मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी यात वायरलेस कनेक्टिव्हिटी Wi-Fi 6, आणि वायरलेस ॲक्सेसरीज साठी ब्लूटूथ 5.3 मिळतो.तसेच कॉन्टॅक्टलेस पेमेंट करण्यासाठी NFC सुद्धा मिळतो USB type-C, GPS असे फिचर्स iPhone 15 मध्ये दिले आहेत.

iPhone 15 मध्ये स्टिरीओ स्पीकर, Face ID Unlock, Emergency SOS, आणि Ultra Wideband support असे या स्मार्टफोनमध्ये फिचर्स मिळतात.

iPhone 15 Pros & Cons

iPhone 15 चे फायदे आणि तोटे खालीलप्रमाणे दिले आहेत:

Pros:

  • IP68 डस्ट आणि वॉटर रजिस्टंट, सोबत चांगली बिल्ड क्वालिटी मिळते.
  • डायनॅमिक आयलंड मिळतो.हा नॉचऐवजी अधिक उपयुक्त आणि आकर्षक वाटतो.
  • A16 Bionic प्रोसेसर अजूनही सक्षम आहे. रोजच्या वापरासाठी आणि गेमिंगसाठी पुरेशा शक्तिशाली आहे
  • 2026 मध्ये किंमत कमी झाल्याने व्हॅल्यू फॉर मनी पर्याय
  • 48MP मेन कॅमेरा सेन्सर चांगले डिटेल्स फोटो काढून देतो. व्हिडिओची गुणवत्ता ( 4K Dolby vision ) अजून चांगला आहे.

Cons:

  • अँड्रॉइड स्मार्टफोनपेक्षा चार्जिंग स्पीड कमी फक्त 20W
  • काहीक Apple intelligence फिचर्स पूर्णपणे सपोर्ट होत नाही
  • फक्त 3349mAh बॅटरी नॉर्मल यूज मध्ये दिवसभर चालू शकतो. पण हेवी युज केल्यास दिवसातून एकदा चार्ज करावा लागू शकतो.
  • स्मार्टफोनमध्ये फक्त 60Hz रिफ्रेश रेट त्यामुळे स्क्रोलिंग आणि गेमिंग मध्ये फरक जाणवतो.

iPhone 15 Price in india

iPhone 15 स्मार्टफोनची किंमत भारतात 128GB ₹ 58,900 आणि 256GB ₹68,900 आहे. तसेच स्मार्टफोनचा 512GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 88,900 असून, सध्या हा आउट ऑफ स्टॉक असल्यामुळे त्याचा समावेश केलेला नाही. iPhone 15 ची किंमत आणि स्टॉक वेळोवेळी बदलतो. बॅक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्स तपासून घ्या. त्यामुळे प्रभावी किंमत आणखी कमी होऊ शकते.

Should you buy the iPhone 15 in 2026?

iPhone 15, जर युजर ला iOS हवा आहे. तसेच युजर कॅमेरा+ व्हिडिओ ला प्राधान्य देतो. एक कॉम्पॅक्ट फोन,Apple चा ecosystem आणि Long term वापर हवा असेल अश्या युजर ने हा स्मार्टफोन विचारात घेऊ शकता.

याशिवाय युजरचे पाहिले प्राधान्य फास्ट चार्जिंग सपोर्ट किंवा 120Hz रिफ्रेश रेट हवा असेल. मोठी बॅटरी, आणि नवीन AI फिचर्स पाहिजे असतील. तर युजरने स्मार्टफोन कडे लक्ष केंद्रित न करता इतर पर्यायांचाही विचार करावा

Final Conclusion

थोडक्यात सांगायचे तर 2026 मध्येही iPhone 15 मजबूत आणि विचार करण्यासारखा पर्याय आहे. याचा पॉवरफुल A16 प्रोसेसर रोजची मल्टीटास्किंग,ब्राउझिंग, गेमिंगसाठी सक्षम आहे. तसेच फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीला प्राधान्य देणाऱ्या वापरकर्त्यांसाठी iPhone 15 2026 मध्ये चांगला पर्याय ठरू शकतो

Leave a Comment