iQOO ने परत एकदा त्याचा नवीन बजेट स्मार्टफोन iQOO Z11 Lite भारतीय मार्केट मध्ये सादर केला आहे. उपलब्ध माहिती प्रमाणे स्मार्टफोनची पहिली सेल 30 जुलै 2026 पासून सुरू होणार. तर आपण या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन विषयी जाणून घेणार आहोत.
Table of Contents
ToggleiQOO Z11 Lite 5G Highlights
- 44W Charger with 6500mAh Battery
- 6.74 Inches IPS LCD (HD+)1200 nits HBM 120Hz Refresh rate
- 85.0% screen-to-body ratio
- Mediatek Dimensity 6300 Processor (6 nm)
- MIL-STD-810H Protection
Disign And Build Quality
iQOO Z11 Lite 5G मध्ये प्लास्टिक बॅक आणि प्लास्टिक फ्रेम मिळतो. तसेच या फोनची लांबी (Length) 167.4mm आहे रुंदी (Width) 77.1 आणि फोनची जाडी (Thickness) 8.4mm आहे. आणि स्मार्टफोन वजन 209g इतके आहे
iQOO Z11 Lite 5G मधे पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी यात IP65 मिळतो आणि हा स्मार्टफोन MIL-STD-810H संरक्षण मिळते.पण हा फोन पूर्णपणे मिलिटरी ग्रेड नाहीय स्मार्टफोन फक्त काहीच टेस्ट मधे पास झाला असल्यामुळे वापरकर्ता त्याला कठीण परिस्थितीत वापरू शकत नाही
सांगण्याचे उद्दिष्टे आहे फोन खूप उंचीवरून पडला, गरम/थंड पाण्यात किंवा पाण्यात बुडवून काढला तर अशा वेळी फोनमध्ये काही बिघाड आला तर कंपनी स्मार्टफोनची गॅरंटी देत नाही. त्यामुळे हा स्मार्टफोन वापरकर्त्यांनी काळजीपूर्वक वापरावा
स्मार्टफोन हातात कसा वाटतो? तर स्मार्टफोनच्या मॅट फिनिशिंग मुळे हातातून निसटत नाही 8.4mm जाडी आहे तरी फोन जास्त जाड वाटत नाही. जरी प्लास्टिक फ्रेम आहे तरीही प्रीमियम वाटतो आणि बॅटरी मोठी असल्याने हातात फोन वजन वाटतो पण फोन संतुलित असल्यामुळे हातात अस्वस्थ वाटत नाही.
Display
iQOO Z11 Lite 5G मध्ये 6.74 इंचाची IPS LCD HD+ डिस्प्ले आणि 1200nits (HBM) हाय ब्राईटनेस मोड मिळतो स्मार्टफोन मध्ये स्मूथ स्क्रोलिंग साठी 120Hz रिफ्रेश रेट दिला आहे ज्यामुळे व्हॉट्सॲप इंस्टाग्राम आणि युट्यूब स्क्रोल करताना स्मूथ अनुभव मिळतो आणि गेमिंग मध्ये 120Hz रिफ्रेश रेटमुळे ऍनिमेशन स्मूथ दिसतात.
फोनमध्ये 720 x 1600 पिक्सेल रिसोल्युशन ची डिस्प्ले आणि 85.0% screen to body ratio आहे
या किंमत श्रेणीत डिस्प्ले स्वीकारार्ह आहे पण तुम्हाला जर शार्प आणि व्हायब्रंट स्क्रीन हवी असेल तर तुम्ही Full HD+ AMOLED डिस्प्ले असलेल्या पर्यायांकडे लक्ष केंद्रित करू शकता.
Processor & Performance
iQOO Z11 Lite 5G स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6300 हा प्रोसेसर 19 एप्रिल 2024 ला लाँच झालेला असून हा प्रोसेसर मिड रेंज 5G स्मार्टफोन साठी TSMC ने (6nm)प्रोसेसवर बनवला आहे. 6nm टेक्नॉलॉजी वर आधारित हा प्रोसेसर चांगली परफॉर्मन्स आणि पॉवर एफिसियन्सी देतो. ज्यामुळे प्रोसेसर बॅटरीचा वापर कमी करतो आणि फोन अधिक वेळेपर्यंत वापरला तरी जास्त गरम होत नाही. हा प्रोसेसर रोजच्या वापरासाठी ब्राउझिंग, हलकी गेमिंग, मल्टीटास्किंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग साठी चांगला पर्याय ठरू शकतो.
मात्र BGMI, COD mobile , Free Fire Max सारखे गेम मध्यम ग्राफिक्स सेटिंगवर स्मूथपणे खेळता येतात
Camera Review
iQOO Z11 Lite 5G यात ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. आणि याचा प्रायमरी सेन्सर 50 मेगापिक्सेलचा f/1.8 अपर्चरसह Sony IMX852 सेन्सर दिला आहे. यासोबत 0.08MP चा Auxiliary Lens देण्यात आला आहे.
आणि हा सेन्सर मुख्यतः डेप्थ माहिती गोळा करून पोर्ट्रेट मोडमध्ये बॅकग्राउंड ब्लर करण्यास मदत करतो.आणि स्मार्टफोन दिवसा चांगले डिटेल्स फोटो काढून देतो. हा फोन iQOO Z11 Lite कॅमेरा सेंट्रिक फोन नसला तरी स्मार्टफोन दिवसा चांगले डिटेल्स आणि नैसर्गिक रंगासह फोटो काढून देतो.
रोजच्या वापरासाठी आणि सोशल मीडियावर शेअर करता येतील अशा गुणवत्तेचे फोटो काढू शकतो..मात्र फ्लॅगशिप दर्जाच्या कॅमेऱ्याची अपेक्षा ठेवू नये.
स्मार्टफोनचा पोर्ट्रेट मोडमध्ये त्वचेचा टोन थोडा सॉफ्ट दिसतो. बॅकग्राउंड ब्लर बहुतेक वेळा चांगला मिळतो मात्र काही प्रसंगी एज डिटेक्शन अचूक होत नाही. आणि नाईट मोड मध्ये फोटोचे डिटेल्स कमी येतात आणि नॉईस वाढतो.तसेच नाईट मोड चालू केला की फोटो ब्राईटन येतात पण फोटोतील डिटेल्स कमी होतात.
स्मार्टफोन मध्ये 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे जो दैनंदिन सेल्फी, व्हिडिओ कॉलिंग आणि ऑनलाइन मीटिंगसाठी हा कॅमेरा पुरेसा आहे.”रात्रीच्या वेळेत फोटो काढले तर फोटो फारसे स्पष्ट येत नाहीत आणि फोटो झूम केल्यावर फोटो pixelate होतात हा 5 मेगापिक्सलचा कॅमेरा व्हॉटसॲप व्हिडिओ कॉलिंग आणि साध्या कॉलिंगसाठी पुरेशा आहे.
हा स्मार्टफोन दोन्ही कॅमेऱ्याने 1080p / 30 FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉडिंगला सपोर्ट करतो त्यामुळे ज्या वापरकर्त्यांना 4K व्हिडिओ रेकॉडिंगची अपेक्षा आहे.त्या वापरकर्त्याला इथे थोडीशी तडजोड करावी लागू शकते
एकंदरीत स्मार्टफोन कॅमेरा सेंट्रिक फोन नाही. तो बजेट किंमत श्रेणीत बॅटरी लाइफ आणि परफॉर्मन्सला प्राधान्य देणारा स्मार्टफोन आहे
Battery & charging
iQOO Z11 Lite 5G स्मार्टफोन मध्ये 6500mAh क्षमतेची Li-Ion मोठी बॅटरी मिळते. दैनंदिन वापरासाठी हा स्मार्टफोन एक मजबूत पर्याय बनतो. गेमिंग,मल्टीटास्किंग असो किंवा मोबाईल वर व्हिडिओ पाहणे. स्मार्टफोनची बॅटरी एका चार्ज वर साध्या वापरामध्ये दिवसभर चालू शकते.हा स्मार्टफोन 7 ते 9 तासाचा स्क्रीन ऑन टाईम (SOT) देऊ शकतो. स्मार्टफोन किती स्क्रीन ऑन टाईम देतो ते पूर्णपणे वापरकर्त्यावर अवलंबून आहे की तो स्मार्टफोन कसा वापरतो. बाकी बॉक्समध्ये 44W चा फास्ट चार्जर मिळतो जो स्मार्टफोन ला उपलब्ध माहितीनुसार 1 तास 30 मिनिटा मध्ये बॅटरी फुल चार्ज करतो. तसेच यात दोन वैशिष्ट्ये एक्स्ट्रा ॲड ऑन केली आहेत कंपनीने बाय पास चार्जिंग आणि रिव्हर्स वायर चार्जिंग ची वैशिष्ट्ये दिली आहेत.
बघितले तर स्मार्टफोनची बॅटरी चांगली टिकते हेवी युज केला तरी बॅटरी बॅक चांगली बघायला मिळतो. साधारण वापरात याची बॅटरी दिवसभर चालू शकते.बाकी सर्व काही वापरकर्त्यांवर अवलंबून असते की तो स्मार्टफोन कसा वापरतो
Software Experience
हा स्मार्टफोन आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉइड 16 वर येतो आणि हा OrigineOS वर रन करतो स्मार्टफोन मध्ये 2 वर्षाचे अँड्रॉइड अपडेट आणि 4 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट मिळतील असा दावा केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 2+4 वर्षाचे अपडेट हे 6GB RAM व्हेरियंट असलेल्या स्मार्टफोन साठी मिळतील असा दावा कंपनीने केला आहे आणि 4GB RAM असलेल्या स्मार्टफोनसाठी कंपनीने दावा केलेला नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
या OrigineOS मध्ये ब्लॉटवेअर आहेत पण त्यांना अनइंस्ट्रल करण्याची सुविधा दिली आहे.तसेच स्मार्टफोनचा OS ऑप्टिमाईझ असल्यामुळे स्मार्टफोन स्मूथ वाटू शकतो.
iQOO Z11 Lite Connectivity
iQOO Z11 Lite 5G स्मार्टफोनचे कनेक्टिव्हिटी स्पेसिफिकेशन बघितले तर ब्लूटूथ 5.4, Wi-Fi 5, OTG Support, GPS , USB type-C 2.0 , Dual Nano SIM, Hybrid SIM slot SIM किंवा microSD Card साठी उपयुक्त. आणि स्मार्टफोनचा प्लस पॉइन्ट म्हणजे यात 3.5mm Jack आणि FM Redio मिळतो. तसेच 10 5G बॅन्ड आणि ड्युअल Standby सपोर्ट मिळतो ड्युअल Standby च्या सपोर्ट मुळे दोन्ही SIM वर 5G सपोर्ट मिळतो ज्यामुळे एका सिमवर कॉल आला तरी दुसरा SIM 5G वर कनेक्ट राहतो पण प्रत्येक परिस्थितीत 5G राहीलच असे नाही.कंपनीकडून एक खास वैशिष्ट्य मिळते AI Super Link जे स्मार्टफोनला जिथे नेटवर्क कमकुवत असेल तिथल्या ठिकाणी फोनचा नेटवर्क स्थिर ठेवण्यासाठी मदत करतो.
iQOO Z11 Lite 5G AI features
iQOO Z11 Lite स्मार्टफोन मधील AI फिचर्स बघितले तर
स्मार्टफोनमध्ये AI Creation, AI Captions, AI Transcript Assist,आणि AI Photo Enhance हे सगळे फिचर्स स्मार्टफोनमध्ये मिळतात.आणि या AI फिचर्सचा उपयोग लेखन, समरी,लाइव्ह नोट्स व ट्रान्सलेशन,व्हॉइस नोट्स आणि फोटो सुधारण्यासाठी होतो. त्यामुळे हे फिचर्स रोजच्या वापरासाठी उपयोगी ठरू शकतात
iQOO Z11 Lite feature
या iQOO Z11 Lite 5G मध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि सिंगल स्पीकर मिळतो. तसेच स्मार्टफोन मध्ये 200% वॉल्यूम बूस्ट चे वैशिष्ट्ये पण दिला आहे, त्यामुळे वॉल्यूम मोठा ऐकायला येतो. स्मार्टफोनमध्ये solar Flem आणि Midnight Blue असे दोन कलर व्हेरियंट उपलब्ध आहेत,
RAM & Storage
iQOO Z11 Lite 5G यात दोन प्रकारचे Storage आणि RAM चे पर्याय कंपनीने उपलब्ध करून दिले आहेत. ज्यामध्ये UFS 2.2 सह 128GB ते 256GB स्टोरेज तसेच LPDDR4X सह 4GB ते 6GB RAM असे पर्याय उपलब्ध आहेत
iQOO Z11 Lite 5G price in india
Pros
- 2026 मध्येही 3.5mm Jack + FM Redio उपलब्ध आहेत
- 6500mAh मोठी बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो
- IP65 + (MIL-STD-810H) प्रोटेक्शन मिळते
- Dimensity 6300 प्रोसेसर मिळतो जो रोजच्या वापर सहज हाताळतो.
Cons
- NFC मिळत नाही त्यामुळे Contactless पेमेंट करू शकणार नाही
- OIS मिळत नाही त्यामुळे व्हिडिओ आणि लो-लाईट मधे फोटोत स्टेबिलिटी कमी मिळते
- कॅमेरा कमकुवत मिळतो डे लाईट मधे ठीक आहे. पण लो लाईट मधे फोटो आणि व्हिडिओ कमकुवत बघायला मिळू शकतात
- जुन्या स्टाईलचा Waterdrop Notch स्मार्टफोन मध्ये मिळतो.जो 2026 मध्ये आउटडेटेड आहे
iQOO Z11 Lite Conclusion
हा स्मार्टफोन कंपनीने बजेट फोन म्हणून लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बॅटरी आणि परफॉर्मन्स केंद्रित फोन आहे आणि यात 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट मिळत नाही. त्यामुळे कॅमेऱ्याला प्राधान्य देणारा युजर ह्या स्मार्टफोन ला टाळू शकतो. हा स्मार्टफोन डेली चांगली परफॉर्मन्स साधारण गेमिंग, मल्टीटास्किंग करणाऱ्या वापरकर्त्यांनी विचार करू शकतात.