मोटरोला कंपनीचा नवीन स्मार्टफोन Motorola Edge 70 Max ने धमाकेदार फिचर्स सह मार्केटमध्ये एन्ट्री केली आहे. या लेटेस्ट फोन मध्ये Snapdragon 8 Gen 5 पॉवरफुल octa-core प्रोसेसर 7100mAh बॅटरी असे चांगले फिचर्स स्मार्टफोन दिले आहेत या स्मार्टफोनची किंमत आणि डिटेल माहिती पोस्ट मध्ये मिळणार आहे.
Table of Contents
ToggleMotorola Edge 70 Max Highlights
- Snapdragon 8 Gen 5 Octa-core Processor
- Adreno 829 Powerfull GPU
- 7100mAh Battery And 90W Charger
- Stereo Speakers with Dolby Atmos
- Under display Fingerprint scanner
- 5W reverse charging
- 25W wireless charging
- IP68/IP69 Water & Dust Resistance
Motorola Edge 70 Max Full Specifications
Device name: Motorola edge 70 Max
Display: 6.82inche 144Hz, LTPO AMOLED Display
Battery: 7100mAh Battery with 90W wired Charger
Processor: Snapdragon 8 Gen 5 Octa-core Processor
Front Camera: f/2.2 Aparcher 32MP Camera
Rear Camera: Dual Setup 50MP(OIS) + 8MP (ultrawide)
RAM: 8GB to 12GB LPDDR5X RAM
Storage: 256GB UFS 4.1 Storage
OS: Hello UI Android version 16
Connectivity: wi-fi 7, Bluetooth 6.0, NFC, USB type-C 2.0,GPS, eSIM,
Display
Motorola Edge 70 Max ची डिस्प्ले 6.82 इंचाची 2K LTPO AMOLED डिस्प्ले आहे जी PWM डिमिंगला सपोर्ट करते तसेच रोजच्या जीवनात स्मूथ अनुभवासाठी 144Hz ची रिफ्रेश रेट मिळते त्यामुळे स्क्रोलिंग ,गेमिंग आणि मल्टी टास्किंग स्मूथ वाटते.
Motorola edge 70 Max फोनमध्ये HDR 10+ आणि 7000 nits ची पीक ब्राईटनेस मुळे बाहेर डिस्प्ले स्पष्ट दिसतो. आणि या फोनच्या डिस्प्ले संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिला ग्लास 7i दिला आहे.
तसेच 1440 x 3168 pixels ची डिस्प्ले रिसोल्युशन मिळते. तसेच 89.5% Screen to body ratio आणि ( 510 ppi density ) मुळे फोटो आणि व्हिडिओ मधले डिटेल्स खूप शार्प दिसतात आणि डोळ्याला पिक्सेल जाणवत नाहीत.
स्मार्टफोनची डिस्प्ले अत्यंत शार्प,उच्च गुणवत्तेची आणि प्रीमियम अनुभव देणारी आहे
Processor
Motorola edge 70 Max चा प्रोसेसर पॉवर फुल आहे जो 3nm टेक्नोलॉजी वर आधारित असलेला Octa core प्रोसेसर Snapdragon 8 Gen 5 चिपसेट आहे. आणि हा प्रोसेसर पॉवरफुल तर आहेच त्यासोबत हा पॉवर एफिसियंट सुद्धा आहे. त्यामुळे प्रोसेसर बॅटरी कमी कन्स्युम करतो. 3nm प्रोसेसमुळे हा चिपसेट कमी उष्णता निर्माण करतो त्यामुळे दीर्घकाळ गेमिंग करतानाही परफॉर्मन्स अधिक स्थिर राहतो.
Motorola edge 70 Max फोनमध्ये ग्राफिक्ससाठी पॉवरफुल GPU Adreno 829 दिला आहे जो हेवी टास्क गेमिंग मल्टी टास्किंग सुरळीतपणे हॅण्डल करू शकतो. तसेच Adreno 829 GPU मुळे गेमिंग, ग्राफिक्स रेंडरिंग आणि उच्च दर्जाचे व्हिज्युअल टास्क अतिशय स्मूथ चालतात.
प्रसिद्ध मोबाईल गेम्स जसे BGMI,COD Mobile, Genshin Impact, Wuthering Waves सारखे हेवी गेम्स स्मूथ अनुभवासह खेळता येतील. उपलब्ध माहिती नुसार जर Adreno 829 ची तुलना जुन्या Adreno 750 शी केली, तर Adreno 829 परफॉर्मन्समध्ये better आहे. सोबतच तो जास्त Power Efficient सुद्धा आहे.
Battery
Motorola edge 70 Max मध्ये सिलिकॉन कार्बन बॅटरी मिळते जी 7100mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. आणि सिलिकॉन कार्बन बॅटरी टेक्नोलॉजी मुळे त्याच जागेत जास्त mAh बसवता येते. बहुतेक स्मार्टफोन कंपनी याच टेक्नॉलॉजी चा त्यांच्या नवीन स्मार्टफोन मध्ये वापर करत आहेत.
Motorola edge 70 Max मध्ये 90W चा फास्ट चार्जर बॉक्समध्ये मिळतो जो 7100mAh बॅटरीला उपलब्ध माहितीनुसार 50% 21 मिनिटात आणि 100% मात्र 52 मिनिटात फुल चार्ज करतो. स्मार्टफोनचा प्रोसेसर 3nm टेक्नॉलॉजी वर आधारित आहे त्यामुळे प्रोसेसर बॅटरी कमी वापरतो आणि चांगला Battery Backup प्रदान करतो.
हा फोन 25W वायरलेस चार्जिंग आणि 5W च्या रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट ही करतो.
Camera
या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. आणि Motorola edge 70 Max मध्ये 50 मेगापिक्सेल चा OIS प्रायमरी सेन्सर f/1.8 अपर्चर सह Dual Pixel PDAF मुळे कॅमेरा फोटोवर जलद आणि अचूक फोकस करतो.तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंगदरम्यानही फोकस अधिक जलद, स्थिर आणि स्मूथ राहतो.
Daylight मध्ये 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा sharp डिटेल आणि natural कलर्स कॅप्चर करतो. आणि OIS मुळे night Shotsआणि व्हिडिओ मध्ये चांगली stability बघायला मिळते
तसेच f/2.2 अपर्चर वाला 8 मेगापिक्सेलचा ultrawide कॅमेरा आहे. हा ultra wide कॅमेरा थोडा अव्हरेज आहे कमी डिटेल्स कॅप्चर करतो
एकंदरीत हा स्मार्टफोन कॅमेरा फोन नाही पण Daylight + casual Photography साठी चांगली परफॉर्मन्स देतो
Motorola edge 70 Max 4K 30/60 FPS आणि HDR 10+रिकॉर्डिंगला सपोर्ट करतो
स्मार्टफोन मध्ये सेल्फी साठी 32 मेगापिक्सेलचा f/2.2 अपर्चर वाला कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनचा 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा डिसेंट असला तरी हा सेल्फी कॅमेरा दिवसा चांगले डिटेल्स आणि क्लॅरिटी मिळवतो आणि स्किन टोन नैसर्गिक दाखवते.
हा 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा 4K 30 FPS आणि 1080p 30/60 FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.
Connectivity And Durability
Edge 70 Max मध्ये लेटेस्ट ब्लूटूथ 6.0, wi-fi 7, Dual Nano SIM + eSIM support, आणि 14 5G che बँड मिळतात NFC, USB type-C 2.0,GPS अश्या कनेक्टिव्हिटी फिचर्स मिळतात. स्मार्टफोन मध्ये 3.5mm Jack आणि FM Redio चा सपोर्ट मिळत नाही. Motorola edge 70 Max ला धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी IP68 आणि IP69 ची डस्ट आणि वॉटर रजिस्टंट रेटिंग दिली आहे.
या स्मार्टफोन मध्ये अल्युमिनियम फ्रेम मिळते आणि मागचा भाग ग्लास बॅक आहे आणि मागच्या बॅक ग्लास मध्ये गोरिला ग्लास 7i ची सुरक्षा दिली आहे तसेच फ्रंट ग्लास मध्ये पण गोरिला ग्लास 7i ची सुरक्षा मिळते.
OS And AI features
Motorola edge 70 Max मध्ये Hello UI वर आधारित Android अनुभव मिळतो. हा UI क्लीन आणि स्मूथ असून त्यामध्ये कमी Bloatware दिले आहेत. तसेच अनेक उपयुक्त Customization पर्यायही उपलब्ध आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, या स्मार्टफोनला 3 वर्षांचे Android OS Updates आणि 5 वर्षांचे Security Updates मिळतील
AI Features
Motorola Edge 70 Max मध्ये AI अनुभव अधिक सोपा करण्यासाठी स्मार्टफोनच्या बाजूला एक Dedicated AI Button देण्यात आला आहे. या बटणाद्वारे AI Assistant पटकन सुरू करता येतो.
स्मार्टफोनमध्ये मिळणारी प्रमुख AI वैशिष्ट्ये:
- Circle to Search
- Live Conversation
- On-device AI Processing
- AI Photo Enhancement Colours, Details आणि Night Mode सुधारणा
- Smart Connect Lenovo PC आणि Tablet सोबत सहज कनेक्टिव्हिटी
- Adaptive Battery आणि Battery Protection
- RAM Boost :स्टोरेजचा Virtual RAM म्हणून वापर
- Moto Gestures :Flashlight साठी Chop Gesture आणि Camera साठी Twist Gesture
याशिवाय, Motorola ने Motorola Qira नावाचा स्वतःचा AI Assistant सादर केला आहे. यामुळे कंपनी स्वतःचे AI Ecosystem तयार करत आहे.
Motorola Qira मधील प्रमुख AI वैशिष्ट्ये:
- Catch Me Up :Missed Messages आणि Calls चा Summary दाखवते.
- Recall / Remember This : महत्त्वाची माहिती आणि क्षण लक्षात ठेवण्यास मदत करते.
- Pay Attention :स्क्रीनवरील माहितीचे विश्लेषण करून Summary तयार करते.
- Next Move :पुढील योग्य Action किंवा Task सुचवते.
Motorola Edge 70 Max Pros and Cons
Pros
Snapdragon 8 Gen 5 फ्लॅगशिप प्रोसेसर दिला आहे
144Hz रिफ्रेश रेट आणि 6.82 इंचाचा LTPO 2K AMOLED पॅनल दिला आहे
7100mAh बॅटरी आणि 90Wफास्ट चार्जर आणि 25W ची वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळतो
Dedicated AI Button आणि Motorola Qira AI ecosystem स्मार्टफोन मध्ये मिळतो
Cons
MicroSD Card स्लॉट नाही
फक्त 3 वर्षाचे अँड्रॉइड अपडेट मिळतात
8MP Ultrawide कॅमेरा चांगल्या प्रकाशात ठीकठाक फोटो काढतो, मात्र डिटेल्स आणि डायनॅमिक रेंज प्रायमरी कॅमेऱ्याइतकी प्रभावी नाही.
Motorola Edge 70 Max price in india
नवीन लाँच झालेला स्मार्टफोन Motorola edge 70 Max chi किंमत भारतात स्टोरेज व्हेरियंट नुसार 8GB + 256GB ची किंमत ₹54,999 आणि 12GB + 256GB ची किंमत सुमारे 59,999 इतकी आहे. ही किंमत लाँचच्या वेळी घोषित करण्यात आल्या होत्या. Motorola Edge 70 Max ची विक्री भारतात 20 जुलैपासून सुरू होईल. बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनससह ग्राहकांना ₹5,000 पर्यंतची सूट मिळू शकते.
Should you buy the Motorola Edge 70 Max smartphone?
Motorola edge 70 Max हा फ्लॅगशिप-लेव्हल परफॉर्मन्स देणारा स्मार्टफोन आहे. यामध्ये Snapdragon 8 Gen 5 हा 3nm टेक्नॉलॉजीवर आधारित प्रोसेसर देण्यात आला आहे.
सर्वसाधारणपणे जितका उत्पादन प्रक्रियेचा (nm) आकडा कमी असतो तितका प्रोसेसर अधिक Power Efficient असण्याची शक्यता असते. त्यामुळे हा प्रोसेसर कमी वीज वापरूनही उच्च परफॉर्मन्स देण्यास सक्षम आहे.
हा स्मार्टफोन विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी योग्य आहे ज्यांना पॉवरफुल परफॉर्मन्स, दीर्घकाळ टिकणारी 7100mAh बॅटरी आणि उत्कृष्ट 144Hz LTPO AMOLED डिस्प्ले यांचा मजबूत कॉम्बिनेशन हवा असेल. गेमिंग, मल्टीटास्किंग, व्हिडिओ पाहणाऱ्यांसाठी आणि रोजच्या वापरासाठी हा फोन एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
मात्र जर तुमच्यासाठी टेलिफोटो कॅमेरा किंवा सर्वोत्तम कॅमेरा अनुभव सर्वात महत्त्वाचा असेल तर इतर पर्यायांचाही विचार करणे योग्य ठरेल.
Final Thoughts
बघिलते तर Motorola edge 70 Max हा स्मार्टफोन आपल्या किंमत श्रेणीत दमदार स्पेसिफिकेशन्स आणि आधुनिक फीचर्स देणारा स्मार्टफोन आहे. Snapdragon 8 Gen 5 फ्लॅगशिप-लेव्हल परफॉर्मन्स, 6.82 इंचाचा 2K LTPO AMOLED डिस्प्ले, 7100mAh मोठी बॅटरी, 90W फास्ट चार्जिंग, 144Hz रिफ्रेश रेट, अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स, IP68/IP69 रेटिंग आणि AI फीचर्स यामुळे हा फोन प्रीमियम अनुभव देतो.
जर तुम्हाला उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, प्रीमियम डिस्प्ले आणि क्लीन Android अनुभव असलेला स्मार्टफोन पाहिजे असेल, तर Motorola Edge 70 Max हा नक्कीच विचार करण्यासारखा पर्याय आहे.
Motorola Edge 70 Max FAQs
1. Motorola Edge 70 Max ची किंमत किती आहे?
Motorola Edge 70 Max ची भारतातील सुरुवातीची किंमत ₹49,999 पासून सुरू होते. (व्हेरिएंटनुसार किंमत बदलू शकते.)
2. Motorola Edge 70 Max मध्ये Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर आहे का?
हो Motorola Edge 70 Max मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 5 हा 3nm टेक्नॉलॉजीवर आधारित फ्लॅगशिप Octa-core प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर गेमिंग, मल्टीटास्किंग आणि AI कार्यांसाठी उत्कृष्ट परफॉर्मन्स देतो.
3. Motorola Edge 70 Max वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो का?
हो. Motorola Edge 70 Max मध्ये 25W Wireless Charging सपोर्ट मिळतो. तसेच 90W Wired Fast Charging आणि 5W Reverse Charging देखील उपलब्ध आहे.
4. Motorola Edge 70 Max मध्ये IP68/IP69 रेटिंग आहे का?
हो Motorola Edge 70 Max ला IP68 आणि IP69 Dust आणि Water Resistance रेटिंग देण्यात आले आहे, ज्यामुळे हा फोन धूळ आणि पाण्यापासून अधिक सुरक्षित राहतो.
5. Motorola Edge 70 Max गेमिंगसाठी चांगला आहे का?
हो. Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर, Adreno 829 GPU, 144Hz LTPO AMOLED डिस्प्ले आणि LPDDR5X RAM मुळे हा स्मार्टफोन BGMI, Call of Duty Mobile, Genshin Impact आणि Wuthering Waves सारखे हेवी गेम्स स्मूथपणे खेळण्यासाठी योग्य आहे.
6. Motorola Edge 70 Max मध्ये Android Updates किती वर्षे मिळतील?
Motorola Edge 70 Max ला 3 वर्षांचे Android OS Updates आणि 5 वर्षांचे Security Updates मिळतात.
7. Motorola Edge 70 Max मधील AI Button कशासाठी आहे?
Motorola Edge 70 Max मध्ये दिलेल्या Dedicated AI Button च्या मदतीने Motorola Qira AI Assistant पटकन सुरू करता येतो. यामधून Catch Me Up, Recall, Pay Attention, Next Move आणि Live Mode सारखी AI वैशिष्ट्ये वापरता येतात.
8. Motorola Edge 70 Max मध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळते का?
हो. Motorola Edge 70 Max चा 50MP रिअर कॅमेरा 4K 30fps आणि 4K 60fps व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. तसेच 32MP फ्रंट कॅमेराद्वारे 4K 30fps पर्यंत सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड करता येतात.